AurangabadNewsUpdate : कोरोनाच्या भितीमुळे घरफोड्याला ट्रान्सफर करणे टाळले,पोलिस उपायुक्तांनी मागितला खुलासा

जगदीश कस्तुरे
औरंगाबाद – कोरोनाची लागण होण्याच्या भितीमुळे घरफोड्याला शहरातील चार पोलिस ठाण्यांनी ट्रान्सफर करुन घेण्याचे टाळलेव त्यामुळे शहरात पुन्हा घरफोडी झाली हा प्रकार कळतांच पोलिस उपायुक्त निकेष खाटमोडे यांनी शहरातील चार पोलिस ठाण्यांना वरील प्रकरणी खुलासे मागितले.
१८ जून रोजी उस्मानपुरा पोलिसांनी गयब्या गॅंगला अटक करुन १७घरफोड्या उघडकीस आणल्या होत्या.या पैकी काही गुन्हे क्रांतीचौक,वेदांंतनगर, सातारा, जवाहरनगर आणि पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आहेत. म्हणून उस्मानपुरा पोलिसांनी गयब्या गॅंगला वरील पाचही पोलिस ठाण्यांनी ट्रान्सफर करुन घेण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. त्या पत्राला क्रांतीचौक पोलिसांनी प्रतिसाद देत गयब्या गॅंगला ट्रान्सफर करुन घेतले होते. पण उर्वरित चार पोलिस ठाण्यांनी उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या पत्राला केराची टोपली दाखवली.व आरोपी ट्रान्सफर करतांना कोरोना झाला तर काय करावे ? असा टेलिफोनिक सवाल उस्मानपुरा पोलिसांना केला. परिणामी गयब्या गॅंगचा प्रमुख राजू खरे हा उस्मानपुरा पोलिसांनी पकडल्यानंतर जामिनावर त्वरित बाहेर आला.व आपला पराक्रम सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाजवत ७०हजार रु.ची घरफोडी केली.ती सातारा पोलिसांनी उघडकीस आणंत माध्यमांना फोटो आणि प्रेसनोट पाठवून दिली.
उस्मानपुरा पोलिसांच्या आरोपी ट्रान्सफर करवून घेण्याच्या पत्राला पोलिस निरीक्षक संतोष पाटील, सुरेंद्र माळाळे, रामेश्वर रोडगे,एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी गांभिर्याने न घेतल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांच्या गावीही नव्हते झोन क्र.२चे पोलिस उपायुक्त राहुल खाडे हे नेहमीच बिझी असल्याने पत्रकारांच्या प्रश्नांना उतर देण्याची वेळ आली की, एक तर पत्रकारांचे फोन उचलंत नाहीत किंवा मला काही माहित नाही अशी ठरलेली उत्तरे देतात.हा प्रकार ओळखून झोन क्र. १चे पोलिसउपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी जबाबदारीने वरील प्रकार हाताळंत चारही पोलिस ठाण्याच्या प्रमुखांना गयब्या उर्फ राजू खरे प्रकरणात खुलासा मागितल्याचे सांगितले.