Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 2932 : औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1658 डिस्चार्ज , 1111 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 1111 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 107 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत जिल्ह्यात 2932 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Advertisements

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. मुकुंदवाडी (1), कैसर कॉलनी (1), बेगमपुरा (2), चेलीपुरा (1), उस्मानपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), ईटखेडा (2), चिखलठाणा (4), वैजापूर (1), गारखेडा परिसर (5), खोकडपुरा (1), न्यु विशाल नगर (1), बायजीपुरा (1), आंबेडकर नगर (2), बंजारा कॉलनी (2), एस.टी. कॉलनी (1), एन-9 सिडको (3), पुंडलिक नगर (3), छत्रपती नगर (2), जिन्सी राजा बाजार (2), शहानुरवाडी (11), जवाहर कॉलनी (11), जालान नगर (1), वडजे रेसिडेन्सी (1), सिल्क मिल कॉलनी (1), शिवाजीनगर (2), रोजा बाग दिल्ली गेट (2), बन्सीलाल नगर (1), बालाजी नगर (1), भाग्यनगर (3), कोहिनुर कॉलनी (1),एन-11 सिडको (3), जयभवानी नगर (1), गादीया विहार (2), दिवानदेवडी (1), सिडको (1), वाहेगाव (1), एन-11, टिव्ही सेंटर (1), शांतीपुरा, छावणी (1), रहिम नगर (1), प्रकाश नगर (1), बुध्द नगर (1), हडको, टिव्ही सेंटर (1), सुधाकर नगर (1), न्यु हनुमान नगर (1), दुधड (1), कानडगाव, ता. कन्नड (1), देवगाव रंगारी (1), लक्ष्मीनगर (1), वाळूज (1), वडगाव कोल्हाटी, वाळूज (1), चिकलठाणा (1), जयभीम नगर (1), पैठण गेट (1), जुना बाजार (1), सेव्हन हिल, विद्या नगर (1), फत्ती मैदान, फुलंब्री (1), तेली गल्ली, फुलंब्री (1), न्यू बायजीपुरा, इंदिरा नगर (1), अन्य (4) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 63 पुरूष आणि 44 महिला रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

आतापर्यंत 1658 जण कोरोनामुक्त

मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आजपर्यंत एकूण 1658 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

घाटीत चार, खासगीत एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) औरंगाबाद शहरातील कोरोनाबाधित असलेल्या मुकुंदवाडी येथील विश्रांती नगरातील 35 वर्षीय्‍ स्त्री रुग्णाचा 15 जून रोजी संध्याकाळी 6.30 वाजता, रोझाबाग येथील 55 वर्षीय्‍ पुरूष रुग्णाचा रात्री नऊ वाजता, इटखेडा येथील 75 वर्षीय्‍ स्त्री रुग्णाचा 16 जून रोजी मध्यरात्री एक वाजता आणि औरंगाबाद शहरातील हर्षनगरातील 49 वर्षीय्‍ स्त्री रुग्णाचा सकाळी 9.40 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर शहरातील एका खासगी रुग्णालयात बेगमपुऱ्यातील 78 वर्षीय्‍ स्त्री रुग्णाचा आज 16 जून रोजी सकाळी सहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 120, तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 42, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 163 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!