AurangabadNewsUpdate : हर्सूल कारागृहात २९ कैदी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – हर्सूल मध्यवर्ती कारागृहात २९ कैदी कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सापडल्याची माहिती तुरुंग उपमहानिरीक्षक दिलीप झळके यांनी दिली.
तीन आठवड्यांपूर्वी हर्सूल कारागृहातील एक कैदी कोरोना पाॅझिटिव्ह आढळला होता. त्यावेळी तुरुंग अधिक्षक हिरालाल जाधव यांनी याबाबत आमचा कोणीही कैदी कोरोना पाॅझिटिव्ह नसल्याचे माध्यमांना खोटे सांगितले होते. त्यानंतर हर्सूल कारागृहात रुग्णांची संख्या वाढंत गेली. लाॅकडाऊन सुरु असतांना कारागृहात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण कसा आढळतो याबाबत जिल्हाप्रशासनानेही बोलणे टाळले होते.त्याचवेळी अप्परपोलिस महासंचालक सुनिल रामानंद यांनी या बाबत आपण चौकशी करु असे स्पष्टीकरण दिले होते.पण त्यानंतर या चौकशीबाबत काय झाले याचा खुलासा अद्यापही झाला नाही.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!