AurangabadNewsUpdate : जिल्ह्यात 1049 कोरोनामुक्त, 460 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1049 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 460 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 44 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1587 झाली असून उपचारादरम्यान ७८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नवी वस्ती, जुना बाजार (3), चिश्तिया कॉलनी (2), उस्मानपुरा (1), एन-आठ सिडको (2), भवानी नगर (4), शिवशंकर कॉलनी (3), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (2), आझम कॉलनी (4), एन-सहा सिडको (2), युनूस कॉलनी (1), मुकुंदवाडी (2), मिसरवाडी परिसर (1), नारेगाव (2), रेहमनिया कॉलनी (1), उल्का नगरी (2), गल्ली नं.3 कैलास नगर (1), पुंडलिक नगर (1), गल्ली नं. चार संजय नगर (1), शाह बाजार (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), बारी कॉलनी (1), टाऊन हॉल (1), मिल कॉर्नर (1), हर्सुल परिसर (1), अन्य (1) आणि वैजापूर (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 18 महिला आणि 26 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
आतापर्यंत 1049 जण कोरोनामुक्त
औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 06, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 09 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 1049 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
78 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) कोरोनाबाधित असलेल्या बायजीपुरा येथील 60 वर्षीय पुरूष रुग्णाचा 31 मे रोजी रात्री 10 वाजता, जळगाव जिल्ह्यातील बडगुजर गल्ली, यावल येथील (तात्पुरता पत्ता द्वारकापुरी, एकनाथ नगर, औरंगाबाद) 66 वर्षीय महिलेचा आज दिनांक 1 जून रोजी पहाटे 05.30 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच औरंगाबाद शहरातील एका खासगी रुग्णालयात बारी कॉलनीतील कोरोनाबाधित असलेल्या 63 वर्षीय पुरूष रुग्णाचा आज सकाळी 11.30 वाजता, बेगमपुरा येथील 64 वर्षीय महिला रुग्णाचा दुपारी दोन वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर अन्य एका खासगी रुग्णालयात औरंगाबाद शहरातील भाग्य नगरातील 80 वर्षीय आणि समता नगरातील 72 वर्षीय पुरुष कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
त्यामुळे आतापर्यंत घाटीत 63, तीन खासगी रुग्णालयांमध्ये एकूण 14, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण 78 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.