#CoronaEffect : कोणाचे काय तर कोणाचे काय ? प्रेमासाठी “ते ” झाले क्वारंटाइन … !!

Advertisements
Advertisements
Spread the love

प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणतात ते उगीच नाही याचे अनेक किस्से आपणास माहित असतील असच एक किस्सा झारखंड मध्ये घडला असल्याचे वृत्त आहे. झारखंडमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये अशाच एका  प्रेमी युगुलाचा किस्सा उघड झाला.  या क्वारंटाईन सेंटरमध्ये इतर मजूरही आहेत मात्र त्यांना यांचा कोणताही त्रास नसल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. विशेष म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून दूर दूर बसून फक्त डोळ्यांनी त्यांचा संवाद चालू असल्याचे सांगण्यात आले.  त्याचे झाले असे कि , झारखंडमधील एका क्वारंटाईन सेंटरमध्ये आंध्र प्रदेशातून आलेल्या आपल्या प्रियकराला ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तरुणीनं आपल्या प्रियकरासोबत राहण्याचा निश्चय केला आणि घर सोडून थेट क्वारंटाईन सेंटर गाठलं. मिळेलेल्या माहितीनुसार ही तरुणी नुतनडीह गावची रहिवासी आहे.

Advertisements

हे प्रेमी युगुल सज्ञान असतानाही नेहमीप्रमाणे या दोघांच्या  प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध असल्यानं त्यांचं लग्न होऊ नये यासाठी दोन्ही कुटुंबीयांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र या तरुणीने  आपल्या प्रियकरासाठी सगळं सोडून क्वारंटाइन सेंटर गाठल्याची माहिती घरच्यांना मिळाली. कुटुंबियांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये जाऊन प्रियकराला आणि तरुणीला धमकावले  आणि शिवीगाळही केली. त्यानंतर या प्रेमीयुगुलानं घरच्यांच्या भीतीनं क्वारंटाइन सेंटरमधून पळ काढला. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा प्रेमी युगुल क्वारंटाइन सेंटरमध्ये येऊन दाखल झालं. दरम्यान ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनाही आता एकाच क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं आहे.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा तरुण नूतनडीह  इथला असून आणि तरुणी कोलडीह इथली आहे . दरम्यानच्या काळात या दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्यानं दोन वर्षांपूर्वीच  विवाह केला होता. दोघांनाही एकत्र राहायचं होतं मात्र कुटुंबीयांच्या विरोधामुळे ते शक्य झालं नाही. आता ग्रामस्थांनी दोघांनाही क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!