Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadCoronaUpdate 1543 : औरंगाबाद जिल्ह्यात 1029 कोरोनामुक्त, 442 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 1029 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 442 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 45 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1543 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Advertisements

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. भवानी नगर, जुना मोंढा (4), कैलास नगर, गल्ली नं. दोन (3), एन सहा, सिडको (3), जाफर गेट, जुना मोंढा (1), गल्ली नं.17, संजय नगर, मुकुंदवाडी (1), गल्ली नं. चार रहीम नगर, जसवंतपुरा (1), व्यंकटेश नगर, जालना रोड (1), समता नगर (1), नवीन बायजीपुरा (1), अहिंसा नगर, आकाशवाणी परिसर (1), किराडपुरा (3), पिसादेवी रोड (1), बजाज नगर (1), देवळाई परिसर (1), नाथ नगर (1), बालाजी नगर (1), हमालवाडी (1), जुना बाजार (2), भोईवाडा (1), मनजित नगर, आकाशवाणी परिसर (2), सुराणा नगर (1), अझम कॉलनी (1), सादात नगर (1), महेमुदपुरा, हडको (1), निझामगंज कॉलनी (1), शहागंज (1), गल्ली नं. 24 संजय नगर (1), बीड बायपास रोड (1), स्वप्न नगरी (1), चंपा चौक (1), शताब्दी नगर (1), अन्य (3) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 26 महिला आणि 19 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

आतापर्यंत 1029 जण कोरोनामुक्त

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) 02, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) 10 रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 1029 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.
दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू
शासकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये (घाटी) आज 31 मे रोजी पहाटे 12.05 वाजता 62 वर्षीय महिला, दुपारी 12.30 वाजता जुना बाजार येथील 75 वर्षीय पुरूष रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत घाटीत 61, खासगी रुग्णालयात 10, मिनी घाटीमध्ये 01 कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण 72 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!