Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : 1459 : औरंगाबाद जिल्ह्यात आता उरले फक्त 453 रुग्ण, 69 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आजपर्यंत 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर एकूण 453 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज 52 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात 1459 कोरोनाबाधित आढळल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

Advertisements

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. नेहरू नगर, कटकट गेट (1), कैलास नगर, माळी गल्ली (1), एन सहा सिडको (1), भूषण नगर, पहाडे कॉर्नर (1), कैलाश नगर (2), श्रीनिकेतन कॉलनी (1), खडकेश्वर (1), उस्मानपुरा (1), खंडोबा मंदिर, सातारा गाव (2), इटखेडा (3), उस्मानपुरा (3), जुना बाजार (1), विश्रांती कॉलनी एन 2 (3), नारळी बाग गल्ली नं.2 (1), राशेदपुरा, गणेश कॉलनी (1), शिवशंकर कॉलनी, गल्ली नं.1 (1), बायजीपुरा गल्ली नं.2 (1), एन 4 विवेकानंद नगर,सिडको (1), शिवाजी नगर (1), एन सहा संभाजी कॉलनी (1), गजानन नगर एन 11 हडको (5), भवानी नगर, जुना मोंढा (1), जुना बायजीपुरा (2), किराडपुरा (1), रोशनगेट (1), राशीदपुरा (1), मोतीवाला नगर (1), जुना बाझार, अझिम कॉलनी (1), बायजीपुरा (2), एन सहा चिश्तिया कॉलनी (1), मंझूरपुरा (1) , राम नगर (1), दौलताबाद (2), वाळूज सिडको (2), राम नगर, कन्नड (2) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये 18 महिला आणि 34 पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

Advertisements
Advertisements

आतापर्यंत 937 जण कोरोनामुक्त

औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (घाटी) नऊ, जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) बारा रुग्ण आज बरे होऊन घरी परतले आहेत. तर मनपाच्या कोविड केअर केंद्रे, खासगी रुग्णालये, मिनी घाटी, घाटी येथून आतापर्यंत एकूण 937 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेले आहेत.

आतापर्यंत एकूण 69 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू

औरंगाबाद शहरातील एन 12 हडको येथील 65 वर्षीय कोरोनाबाधित पुरूष रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात आज सायंकाळी 6.05 वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे घाटीमध्ये आतापर्यंत घाटीत 58, खासगी रुग्णालयांमध्ये दहा, मिनी घाटीमध्ये एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एकूण 69 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!