Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : नातीशी लग्नासाठी बळजबरी ; वृध्देला खंडणीची मागणी

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : नातीला दुबईवरुन बोलावून घेत तिचे आपल्याशी लग्न लावून दे अन्यथा नातीसोबत असलेले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करण्याचे धमकावत वृध्देकडे पन्नास हजारांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. हा प्रकार सन२०११ पासून आतापर्यंत सुरू होता. याप्रकरणी मोहम्मद जुनेद उर्फ थापा याच्याविरुध्द बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ७५ वर्षीय वृध्देच्या घरात शिरुन १ मे रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास मोहम्मद जुनेद याने नातीला दुबईहून लवकर बोलावून घे. माझ्यासोबत तिचे लग्न लावून दे असा तगादा लावला. तसेच तिचे फोटो व्हॉटस्अ‍ॅप व सोशल मिडीयावर व्हायरल करण्याचे धमकावत पन्नास हजारांच्या खंडणीची मागणी केली. त्यावरुन वृध्देने बेगमपुरा पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक नंदकुमार शिंब्रे करत आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!