#CoronaEffect : पोलिस उपअधीक्षकांची मुलांसह मुंबईहून औरंगाबादेत एंट्री, पोलिसांनी केले जिल्हा रुग्णालयाच्या हवाली…

औरंगाबाद शहराच्या जय नगर ज्योतिगार भागात राहणारे ठाणे महामार्ग पोलिस उपअधिक्षक हे आजारी रजा टाकून औरंगाबाद ला पोहोचले खरे पण औरंगाबाद पोलिसांनी त्यांची चौकशी करुन कोरोना चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले हे योग्य केले अशी प्रतिक्रिया ठाणे महामार्ग पोलिस अधिक्षक दिगंबर प्रधान यांनी दिली,
हे पोलिस उपअधिक्षक महोदय ठाणे महामार्ग पोलिस विभागात पोलिस उपअधिक्षक म्हणून काम करतात त्यांनी कालच आजारी रजा टाकून जालनन्याला जाण्यासाठी औरंगाबादेत धाव घेतली पण हा प्रकार ठाणे पोलिसांना आजच कळाला. औरंगाबादेत ज्योतीनगर ,उस्मानपुरा भागातील जयनगरमधे साईसिध्दी अपार्टमेंटमधे आज पहाटे ३ वा. पोहोचले अशी माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी उस्मानपुरा पोलिसांना याबाबत फोनवरुन माहिती दिली. त्यानुसार पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांनी आपल्या पथकासह त्यांच्या अपार्टमेंटकडे धाव घेत त्यांची जिल्हा रुग्णालयात पुढील चाचणीसाठी रवानगी केली.
हे पोलीस उपाधीक्षक मूळचे भोकरदनचे आहेत . औरंगाबाद हाॅटस्पाट असतांना ते येथे कशासाठी आले ? याची चौकशी केली जात आहेत त्यांच्या चाचणीचा प्राथमिक अहवाल रात्री उशीरा पर्यंत येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.