#CoronaVirusEffect : घाटी रुग्णलयातील ब्रदरला कोरोना, आरोग्य कर्मचाऱ्यांना पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज देण्याची मागणी

A 38 year old male nurse at Government Medical College & Hospital (GMCH), Aurangabad has tested positive for #COVID19. He has been shifted to District Civil Hospital: GMCH Dean Dr Kanan Yelikar #Maharashtra
— ANI (@ANI) April 6, 2020
औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर सुरु झाला असून घाटी रुग्णालयात काम एका परिचारकाला, ब्रदरला कोरोनाची लागण झाली आहे. गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात काम करणारा हा परिचारक आहे. या परिचारकाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर या परिचारकाला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ही माहिती दिली. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले. हा परिचारक ३८ वर्षांचा आहे अशीही माहिती डॉ. येळीकर यांनी एएनआयला सांगितले.
दरम्यान काल औरंगाबादमध्ये रविवारी एका करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. या ५८ वर्षीय व्यक्तीला काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. यानंतर या रुग्णाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आलं होतं. रविवारी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच आता घाटी रुग्णालयातल्याच एका परिचारकाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आला आहे.बी यामुळे औरंगाबादेतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ झाली आहे.
डाॅक्टर्स व आरोग्य कर्मचार्यांना आतातरी पीपीई कीट देण्याची मागणी
दरम्यान आयटक प्रणित महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटनेचे सेक्रेटरी अँड अभय टाकसाळ यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अडचणींसंदर्भात म्हटले आहे कि , आमच्या संघटनेने १७ मार्च २०२० रोजी निवेदन देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला प्रशासनाला डाॅक्टर्स व आरोग्यं कर्मचारी यांना मुबलक प्रमाणात पी पी ई कीट, सॅनिटायझर, मास्क, ग्लोज उपलब्ध करुन द्या, सर्व कर्मचारी व डाॅक्टरांचा १ कोटी रुपयांचा विमा काढा अशी विनंती करण्यात आली होती . त्यापैकी काहीही रुग्ण दगावल्यावरही आलेले नाही, शहर लाॅक डाऊन असतांना घाटीत गर्दी आहे आणि जागो जागी हात धुण्यासाठी पाणी व हॅण्डवॉश नाहीत. आपन थाळ्या व टाळ्या वाजवुन मोकळे झालो परंतु आपल्यासाठी अरोराञ कष्ट करणार्या व कोरोनाशी लढा देणाऱ्या डाॅक्टर्स व आरोग्यं कर्मचार्यांना पी पी ई कीट देण्यासाठी शहरातील नागरीकांनी पाठपुरावा केला नाही . हे पी पी ई कीट मुबलक प्रमाणात हवे असते, ते वापरणाऱ्या डाॅक्टर्स व आरोग्य कर्मचार्यांना दर ६ तासांनी अगोदरचे कीट नष्ट करुन नवीन कीट द्यावे लागते, असे असतांना अद्याप एक कीट देखील उपलब्ध करून दिले नाही, हा बाब संतापजनक व खेदपुर्ण आहे . त्यासाठी घाटीतील डाॅक्टर्सना काम थांबवुन निदर्शने करावी लागली . घाटीतील डाॅक्टर्स व आरोग्य कर्मचार्यांना आतातरी पी पी ई कीट द्या अशी विनंती मुख्यमंत्री व आरोग्य मंञ्यांना आम्ही करीत आहोत. सोशल मिडिया द्वारे औरंगाबादेतील सर्व नागरीक प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांना विनंती करनारी मोहीम राबवावी तरच थाळ्या व टाळ्या वाजवुन व्यक्त केलेला आदर हा खरा ठरेल . आत्ताच अपघात विभागातील एक परिचर कोरोना पॉझीटीव्ह झाला आहे, आतातरी पी पी ई कीट सर्व आरोग्यं कर्मचारी व डाॅक्टरांना द्या अशी विनंती आयटक करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे .