Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या संदर्भात फिरणारा ” तो ” मॅसेज पूर्णतः फेक …

Advertisements
Advertisements
Spread the love

देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसोंदिवस वाढत असतानाच सोशल नेटवर्किंगवर अफवांचे पेव फुटले आहे. सध्या सोशल मिडियावर जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO च्या नावाने एक संदेश व्हायरल होताना दिसत आहे. या व्हायरल मेसेजमध्ये भारतातील लॉकडाउनसंदर्भात प्रोटोकॉल लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांबरोबर घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फर्न्समध्ये लॉकडाउन उठवण्यासंदर्भात चर्चा केली. टप्प्याटप्प्यांमध्ये लॉकडाउनचे नियम शिथिल केले जातील असे संकेत पंतप्रधानांनी दिले आहेत. तसेच यासंदर्भात काही सल्ला असल्यास तो पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्याचे आवाहन मोदींनी वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना केलं आहे.

Advertisements

अलीकडच्या काळात सोशल मीडियावर अनेक मॅसेज व्हायरल होत आहेत असाच एक मॅसेज जागतिक आरोग्य संघटनेच्या नावाने फिरत असून त्यात म्हटले आहे कि , भारतामध्ये सर्वात घातक अशा कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन प्रोटोकॉल राजी केले आहेत. तसेच भारतामधील २१ दिवसांचा लॉकडाउन संपल्यानंतर याचा कालावधी वाढण्यात येणार असल्याचं या व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं आहे. भारतामध्ये लॉकडाउनचे प्रोटोकॉल कसा असेल यासंदर्भात सांगताना १५ एप्रिल ते १९ एप्रिलदरम्यान लॉकडाउन हटवण्यात येईल त्यानंतर पुन्हा २० एप्रिलपासून १८ मेपर्यंत लॉकडाउन करण्यात येईल. या काळामध्ये रुग्णांची संख्या वाढली नाही तर लॉकडाउन काढून टाकण्यात येईल असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

याबाबत पीआय बी ने मात्र हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे. पण हा मेसेज इतका व्हायरल झाला आहे की जागतिक आरोग्य संघटनेच्या ईशान्य आशियाच्या ट्विटवर हॅण्डलवरुन यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. अशाप्रकारचा कोणताही आदेश डब्ल्यूएचओने दिलेला नाही असं या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. “डब्ल्यूएचओच्या नावाने सोशल मिडियावर फिरत असणारा लॉकडाउन प्रोटोकॉलचे संदेश तर्कशून्य आणि खोटे आहेत. डब्ल्यूएचओने लॉकडाउनसाठी कोणतेही प्रोटोकॉल जारी केलेले नाहीत,” असं या ट्विटमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!