Aurangabad : मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटणारा पिता जागीच ठार

औरंगाबाद – येत्या एप्रिल मधे स्वता:च्या मुलाचे लग्न ठरलेला बाप शनिवारी दुपारी १च्या सुमारास पत्रिका वाटता वाटता सरळ देवाघरी गेला.या हृदयद्रावक घटनेने उपस्थितांचे मन हेलावले.या प्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल होणे बाकी आहे.मयतावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल असे सातारा पोलिसांनी सांगितले.
मोह्हमद अब्दुल हक मो.इसाक(६५) रा. पटेल लाॅन्स च्या मागे धंदा निवृत्त अभियंता असे मयताचे नाव आहे.मो.अब्दुल हक यांच्या मुलाच्या लग्नाच्या पत्रिका वाटण्यासाठी हक दुचाकीवरुन पत्रिका वाटण्यास जात होते त्याचवेळी गोदावरी टी.पाॅईंटवरुन महानुभाव आश्रमाकडे भरधाव वेगाने जाणार्या ट्रकने हक यांमा ठोकरले. हक खाली पडतांच हायवाचे चाक त्यांच्या डोक्यावरुन गेले.या प्रकरणी ट्रक चालक संदीप एकनाथ वायकर (३०) रा.देवळी तांडा याला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.अपघात घडताच घटनास्थळी एएसआय मच्छिंद्र ससाणे, पोलिस कर्मचारी वैष्णव आदिंनी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलिस करंत आहेत.