मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा

औरंगाबाद – नव्याने नियुक्त करण्यात आलेले महाराष्र्ट नवनिर्माण सेनेचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्राॅसिटीचा गुन्हा रविवारी पहाटे १वा. दाखल झाला. अशी माहिती सहाय्यक पोलिसआयुक्त गुणाजी सावंत यांनी दिली.
नितीन रतन दाभाडे असे फिर्यादीचे नाव आहे. शनिवारी २९फेब्रूवारी रोजी हर्षवर्धन जाधव यांच्या अदालत रोडवरील इमारतीच्या परिसरात दाभादडे यांनी पानाची टपरी टाकली होती.व त्यावर निळा झेंडा बसवला होता. शनिवारी संध्याकाळी ६.३० वा. जाधव यांना हा प्रकार कळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत फिर्यादी दाभाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करंत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त गुणाजी सावंत करत आहेत.