Sad News : शाॅटसर्किटमुळे जीव गुदमरुन मुलगा दगावला, आई,वडिल बहीण अत्यवस्थ

औरंगाबाद – आज (गुरुवारी) पहाटे साडेपाच वा. जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत साईशरण पेट्रोलपंपाजवळील घरात शाॅटसर्किटने आग लागून घरातील एलइडी जळाल्यामुळे दहा वर्षाचा मुलगा गुदमरुन मरण पावला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संस्कार शामसुंदर जाधव (१०) असे मयत मुलाचे नाव आहे. तर संस्कार ची बहीण संस्कृती,(१९) आई सविता(४०) व वडिल शामसुंदर बाबासाहैब जाधव (४५) जखमी झाले आहेत.त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.या घटनेत सविता आणि संस्कृती यांची प्रकृती स्थिर आहे तर शामसुंदर जाधव यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत अशी माहिती एपीआय श्रध्दा वायदंडे यांनी दिली.शामसुंदर जाधव है एलईडी बल्ब चे असेंबलिंग आणि सप्लाय काॅंट्रॅक्टर म्हणून काम करतात. त्यामुळे बरेचसै एलईडी त्यांच्या घरात व परिसरात पडून राहायचे संस्कार च्या मृत्यूने जवाहरनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास एपीआय वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवाहरनगर पोलिस करंत आहेत