चर्चेतली बातमी : मनसेचा बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध मनसेचा एल्गार, मोर्चापूर्वी दादर आणि ठाण्यात मनसैनिकांकडून आरती…

बांगलादेशी, पाकिस्तानी घुसखोरांविरुद्ध मुंबईमध्ये आज मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल होत आहेत. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मोर्चासाठी केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी धडकणार आहेत. दरम्यान राज ठाकरे सहकुटुंब मोर्च्यात सहभागी होणार आहेत. मोर्चात राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, सून मिताली ठाकरे, मुलगी उर्वशी ठाकरे सर्व सहभागी असतील अशी सूत्रांची माहिती आहे. आणि हे सर्व कुटुंब मोर्चाचा संपूर्ण रस्ता चालत जाणार आहेत.
ठाण्यातील मनसैनिकांनी महामोर्चासाठी रवाना होण्याआधी ठाण्यातील पाचपाखडी येथे मारुतीच्या मंदिरात आरती केली. डोक्यावर भगव्या टोप्या, हातात राजमुद्रा असलेले झेंडे आणि भारताचा ध्वज घेऊन आरती केली. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ही आरती केली. तर तिकडे दादरमध्येही मनसैनिकांनी आरती केली. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडेही उपस्थित होते. मुंबईमध्ये आज मनसेच्या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघणार आहे. या भव्य मोर्चासाठी राज्यभरातून मनसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. मोर्चानंतर अध्यक्ष राज ठाकरे सभेत मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. या सभेसाठी आझाद मैदानात जय्यत तयारी करण्यात आली आहे.
मनसेचा मोर्चा आझाद मैदानात पोहचल्यानंतर राज ठाकरे मनसैनिकांना संबोधित करणार आहेत. त्यासाठी एक भव्य स्टेज उभारण्यात आहे. आझाद मैदान हे तारेच्या कुंपणाने दोन भागांत विभागालं गेलं असल्याने तारेच्या आतमध्ये पदाधिकाऱ्यांना बसण्याची सोय तर सामान्य मनसैनिकांना तारेच्या दुसऱ्या बाजूला बसण्याची सोय करण्यात आली आहे. पोलीस बांदोबस्तही भक्कम आहे. या मोर्चासाठी येणा-या कार्यकर्त्यांच्या गाड्या पारसी जिमखाना येथे लाऊन त्यांनी पायी आझाद मैदानला यावे, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. तर मुंबईत मनसेच्या मोर्चाच्या समर्थनासाठी काल मनसेने पुण्यात रॅली आणि मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकरली. अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे अल्टीमेटम देऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. दरम्यान पोलिसांशी झालेल्या चर्चेनंतर अखेर रॅली रद्द करण्यात आली.