हिंगणघाट शिक्षिका जळित प्रकरण : पीडितेची प्रकृती अद्याप स्थिर पण चिंताजनक…

वर्धा जिल्यातील हिंगणघाट येथील पीडित शिक्षिका अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. तिच्या प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. या न्यूज बुलेटिन नुसार हिंगणघाट येथील पीडित युवतीची प्रकृती अजूनही क्रिटिकल अजून इन्फेक्शन होण्याची भीती डॉ. दर्शन रेवनवार व्यक्त केली आहे. पीडितेची प्रकृती स्थिर आहे पण चिंताजनक आहे. शुक्रवारी तिची सर्जरी करणार करण्यात येणार असून अद्याप तिने डोळ्यांच्या पापण्या उघडल्या नसल्याची धक्कादायक माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या मेडिकल न्यूज बुलेटिनमध्ये डॉ. राजेश अटल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्णाचा त्रास वाढण्याची शक्यता आहे. तिच्या सर्जरीमध्येही कॉम्प्लिकेशन वाढण्याची शक्यता आहे तर संसर्गदेखील होऊ शकतो. शुक्रवारी तिची ड्रेसिंग करण्यात येणार असून आज तिला रक्त देण्यात येणार आहे. प्रोटीनचा लॉस नको म्हणून औषधे देण्यात येत आहेत. तर घशाची सूज कमी होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जळीत प्रकरणामध्ये संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे. फुफ्फुसात संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्वचा जाळल्यानेदेखील संसर्ग होऊ शकतोय तर हृदयाची गती वाढली आहे. त्यामुळे सगळ्या बाजूने तिची काळजी घेण्यात येत आहे. डॉ. अनुप मरार यांनी देखील पीडितेच्या प्रकृतीची माहिती दिली आहे. एक संपूर्ण आईसीयू युनिट केवळ या पीडितेसाठी राखीव करण्यात आले आहे. संसर्ग टाळण्यासाठी विशेष नर्स ठेवण्यात आल्या आहेत. युनिटमध्ये कुणालाही प्रवेश नाही. त्यामुळे येणाऱ्यांना विनंती आहे की रुग्णाला भेटण्याची मागणी करू नये असं त्यांनी जाहीर सांगितलं आहे.
औरंगाबाद जळीतकांडातील पीडीत महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबादच्या सिल्लोडमधील अंधारी गावात या महिलेला गावातील बिअरबार मालकाने घरात घुसून पेटवलं होतं. यात महिला ९५ टक्के भाजली होती. महिलेवर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र ९५ टक्के भाजल्याने महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.