Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : आंतरराज्य टोळीतील तीन दरोडेखोरांना दिल्लीतून अटक, २३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ग्रामीण गुन्हेशाखा आणि करमाड पोलिसांची संयुक्त कारवाई

Spread the love

औरंगाबाद – सुरक्षारक्षकारक्षकांचे हातपाय बांधून १८ लाख रु.चे अल्यूमिनिअम वायरचे ड्रम पळवणार्‍या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील तिघांना दिल्लीतील रोहिणी भागातील सब्जीमंडी परिसरातून ३१ जानेवारी रोजी अटक केली.व पोलिस कोठडी मिळवून २० लाख रु.रोख कार आणि मोबाईल असा २३लाख ३५हजारांचा मुद्देमाल जप्त करंत ग्रामिण गुन्हेशाखा आणि करमाड पोलिसांनी कारवाई पार पाडली.
दिनेशकुमार बाबूलाल मालवी(२८) रा.कालियाखेडी जि.मनसोर मध्यप्रदेश, तर राजस्थातील जयपुर परिसरातील राहूल कैलासचंद्र शर्मा (२७)आणि नितेश मनोजकुमार शर्मा(२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत.वरीलपैकी दिनेश मालवी ने २०१६ मधे नागपूरच्या नरखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तेथील सुरक्षारक्षकाला हाताशी धरुन अल्यूमिनिअम वायर लंपास केल्याचा गुन्हा दाखल आहे. तर राहूल आणि नितेश शर्मा हे नव्यानेच टोळक्यात सामिल झाल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे.

दि. २५जानेवारी रोजी मध्यरात्री करमाड जवळील लालवाडी शिवारात महापारेषण चे काम सुरु असलेल्या ठिकाणाहून १८लाख रु. किमतीचे अल्यूनिअम वायर असलेले ९ड्रम पाच दरोडेखोरांनी ट्रक मधे टाकून लंपास केले होते. लालवाडी शिवारात गेल्या तीन आठवड्यांपासून मोहंमद लाल यांनी महापारेषण च्या कामाचे कंत्राट घेतले आहे. त्या ठिकाणी पश्र्चिमबंगाल मधील मालदा जिल्ह्यातील कतलामारी येथून कामगार आणण्यात आलेले आहेत. त्यावेळी लालवाडी शिवारात ३०अल्यूमिनिअमचे वायर असलेले ड्रम आहेत.त्यापैकी ९ ड्रम दरोडेखोरांनी ट्रकमधे भरुन नेले. यानंतर कामावर असलेला सुरक्षा कर्मचारी मोकलेसुर रहेमान अब्दुल(४१) याच्या फिर्यादीवरुन करमाड पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा २६जानेवारी रोजी दाखल झाला होता.

शहराजवळील टोलनाक्यावरील सी.सी.टि.व्ही.मधे हा ट्रक कैद झाला होता.त्यानुसार पोलिस अधिक्षक मोक्षदापाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलिस अधिक्षक गणेश गावडे यांनी ग्रामीण गुन्हेशाखा आणि करमाड पोलिसांची दोन पथके तयार करुन मध्यप्रदेश, राजस्थान, दिल्ली भागात पाठवले होते.त्यानंतर ३० जानेवारी रोजी खबर्‍याच्या माहितीवरुन दिल्लीच्या रोहिणी परिसरात करमाड गुन्ह्यातील तीन दरोडेखोर लाॅजवर थांबले असल्याचे पथकांना कळताच वरील तिन्ही आरोपींच्या मुस्क्या आवळून औरंगाबादला आणले.पोलिस कोठडीमधे असतांना आरोपींनी चोरलेला मुद्देमाल विक्री करुन २०लाख रु.रोख मिळाल्याचे सांगितले.त्या नुसार करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश खेतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. गणेश जागडे यांनी आरोपींना पुन्हा दिल्लीत नेऊन गुन्ह्यात वापरलेली कार रौख रक्कम आणि मोबाईल असा २३लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.वरील कारवाई पोलिस निरीक्षक ग्रामीण गुन्हेशाख् भागवत फुंदे पी.एस.आय. भगतसिंग दुलंत, विक्रम देशमुख पोलिस कर्मचारी बाळू पाथ्रीकर करमाड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश खेतमाळ, पी.एस.आय. जागडे, नवनाथ कोल्हे, दिपेश नागझरे, प्रमोद साळवी,सुरेश सोनवणे, प्रवीण ठाकरे यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!