नको “त्या ” अवस्थेत पहिले , पत्नी आणि प्रियकरावर पतीने केला बॉम्ब हल्ला…

अयोध्येतील काशीराम कॉलनीत पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नाको त्या स्थितीत पहिल्याने पतीने त्यांच्यावर गावठी बॉम्बने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून, पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.
अयोध्येतील कोतवाली येथील रायगंज चौकी क्षेत्रात आरोपी जयकिशन उर्फ जालिम सिंह आपल्या पत्नीसोबत राहत होता. शनिवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तो कामावरुन घऱी आला, तेव्हा पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नाको त्या स्थितीत पहिल्याने पाहिले. त्याने पत्नीच्या प्रियकरासोबत भांडण्यास सुरुवात केली. काही वेळाने पती जामिल सिंह गावठी बॉम्ब घेऊन आला आणि पत्नीच्या प्रियकरावर एकामागून एक फेकण्यास सुरुवात केली आणि फरार झाला. त्याने एकूण तीन बॉम्ब पत्नीच्या प्रियकरावर फेकले, यामधील दोन बॉम्ब फुटले.
पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा जालिम सिंह फरार झाला होता. घटनास्थळाची पाहणी केली असता एका बॉम्ब सापडला. बॉम्बशोध पथकाच्या सहाय्याने तो तात्काळ निकामी करण्यात आला. या हल्ल्यात प्रियकर गंभीर जखमी झाला असून पत्नी किरकोळ जखमी झाली आहे. पोलिसांनी त्या दोघांना ही रुग्णालयात दाखल केले. पोलीस सध्या आरोपी पती जालिम सिंहचा शोध घेत आहे.