Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हिंगणघाट येथील ” त्या ” पीडित तरुणीची प्रकृती गंभीर , राज्यभर संतप्त प्रतिक्रिया , पालकांनी दिली ” हि ” माहिती

Spread the love

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून प्राध्यपिकेला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या निंदनीय घटनेत ती प्राध्यापिका ४० टक्के भाजली होती. तिच्यावर सध्या नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती गंभीर असून पुढचे ४८ तास महत्त्वाचे असल्याचे  डॉक्टरांनी सांगितले आहे. पीडितेची श्वासनलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतोय. तिच्या डोळ्यालाही दुखापत झाली आहे. तिचा  चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला गेलाय. त्यामुळे तिची परिस्थिती नाजूक आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज हिंगणघाट बंदचं आयोजन करण्यात आले असून उपविभागीय कार्यालयावर र्वपक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला आहे.

एकतर्फी प्रेमातून तिला जाळण्यात आलं आहे. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या भीषण हल्ल्यामध्ये तिचा चेहरा संपूर्ण जळाला असून, वाचाही गेली आणि दृष्टीदेखील गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी लिकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अजून बाहेर यायचे आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली हिंगणघाटात दाखल झाले असून या प्रकाराने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. नंदोरी नाक्याजवळ पीडित तरुणीच्या गावातील दोन  तरुण आणि पीडिता यांच्या शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तरुणांनी तिला भर रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले तर अधिक तपासातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे.

चार महिन्यापूर्वी मुलीने केली होती तक्रार , पालकांनी दिली माहिती 

“चार महिन्यांपूर्वी मुलीने हा तरुण त्रास देतो, हे सांगितले होते. मी त्याला समजावलेही होते. यानंतर पुन्हा असे वागणार नाही, असेही तो म्हणाला होता. मात्र त्याच वेळी जर पोलिसांत तक्रार दिली असती तर आज ही वेळ आणि असा दिवस पाहण्याची वेळच आली नसती”, अशी हतबलता शिक्षिकेच्या पालकांनी व्यक्त केली. हिंगणघाट पासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावरील दारोडा गावात राहणाऱ्या या कुटुंबातील ही तरुणी. मुलगी हुशार. त्यामुळे तिचे वडील अरुण आणि आई संगीता यांनी तिच्या शिक्षणाची अबाळ होऊ नये म्हणून मुलीला आठवीनंतर हिंगणघाटच्या शाळेत प्रवेश दिला. तेव्हापासून ही पोर रोज सकाळी न चुकता बसने शाळेला जायची. असेच शिकत तिने हिंगणघाटच्या बिडकर कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. तेथून बीएससीचे पदवी शिक्षण घेतल्यानंतर ती वर्धेच्या जे. बी. सायन्स कॉलेजमध्ये एमएससीसाठी दाखल झाली. शिक्षण घेऊन प्राध्यापक होण्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या या कन्येने भविष्यात आपल्या आयुष्यात काय दिवस लिहून ठेवला आहे, याची कल्पनाही केली नसेल. जाचक महाविद्यालयातून बी. एड.चे शिक्षण घेत असलेल्या या कन्यारत्नाने आपल्या हिमतीवर बॉटनी हा विषय शिकविण्यासाठी तासिका तत्वावर कॉलेजमध्ये प्राध्यापकपदावर काम सुरू केले. मात्र इथेच तिचा घात झाला. तिच्या मागावर असलेल्या एका माथेफिरूने सोमवारी तिला कॉलेजकडे जात असताना सकाळी सातच्या सुमारास नांदुरी चौकात गाठले आणि तिच्यावर पेट्रोल फेकत आग लावली.

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी एक व्यक्ती मुलाला शाळेत सोडण्यासाठी जात होता. त्याने या तरुणाला हातात पेट्रोलचा बोळा घेऊन उभे असल्याचे पाहिला. हा तरुण कचरा पेटविण्याच्या इराद्याने उभा असावा, असे त्याला वाटले. पण हा कुणाला तरी पेटविण्यासाठी उभा असल्याचे त्याच्या मनीही आले नसेल. अखेर काळाने डाव साधला आणि पुढील अर्ध्या तासात हे थरारनाट्य घडले. त्यामुळे हा घटनेची माहिती मिळाल्यापासून तिचे पालक सुन्न झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!