पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक

भारत-पाकिस्तान दरम्यानच्या महत्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक सुरु आहे. या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षणमंत्री निर्मला सितारामण यांच्यासह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले हे देखील उपस्थित आहेत.