‘आरएसएसचे पंतप्रधान भारत मातेशी खोटे बोलतात’ , राहुल गांधी यांचा व्हिडीओ

https://twitter.com/RahulGandhi/status/1210062130415693825
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रामलीला मैदानावरील भाषण आणि डिटेन्शन सेंटरच्या बाबतीत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी डिटेंशन सेंटरबाबत खोटे बोलले असल्याचा आरोप केला आहे. डिटेक्शन सेंटरबाबत काँग्रेस वाईट हेतूने लोकांमध्ये खोटे पसरवत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावरील सभेत बोलताना म्हटले होते. पंतप्रधानांच्या याच विधानाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदी खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.
या बाबत राहुल गांधींनी एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि , ‘आरएसएसचे पंतप्रधान भारत मातेशी खोटे बोलतात’. त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये आसाममधील एका डिटेंशन सेंटरचा उल्लेख आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्विटवरही #jhootjhootjhoot असा हॅशटॅग लावला आहे.
दिल्ली भाजपतर्फे रामलीला मैदानावर २२ डिसेंबर रोजी दिल्लीतील बेकायदा वसाहती नियमित करण्याबाबत ‘थँक यू रॅली’ सभेचे आयोजन केले होते. या वेळी पंतप्रधान मोदींनी बेकायदा वसाहतींमध्ये राहणाऱ्या लोकांचे आभार मानले. ‘थँक यू रॅली’मध्ये पंतप्रधानांनी कॉंग्रेसवर डिटेंशन सेंटरबाबत खोटे बोलण्याचा आरोप केला. ‘काँग्रेस अजूनही भ्रमात आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की काँग्रेस आणि शहरी नक्षलवाद्यांनी पसरवलेल्या डिटेंशन सेंटरबाबतच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत. हे त्यांचे प्रयत्न द्वेषयुक्त आणि वाईट हेतूने भरलेले आहेत. हे खोटे आहे, खोटे आहे, खोटे आहे.’