Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या सावित्रीबाई फुले यांचा काँग्रेस पक्षांचाही राजीनामा

Spread the love

भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी खासदार सावित्री बाई फुले यांनी काँग्रेस पक्षाचाही राजीनामा  दिला आहे. आपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नसल्याने आपण राजीनामा देत आहे असं त्यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशातील बहराइच मतदारसंघातून सावित्री बाई फुले  भाजपच्या खासदार होत्या. लोकसभा निवडणुकीआधीच त्यांनी मार्चमध्ये भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता.

काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सावित्री बाई फुले यांनी  स्वतःच पत्रकार परिषदेत दिली. आपलं म्हणणं पक्षात ऐकून घेतलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आता काँग्रेस सोडल्यानंतर आपला स्वत:चा पक्ष काढणार असल्याचं सावित्री फुले यांनी म्हटलं आहे.

भाजपवर  दलित विरोधी असल्याचा आरोप करीत म्हणत सावित्री बाई फुले यांनी काँग्रेस प्रवेश केला होता. दलितांचा आवाज उठवणाऱ्या सावित्री बाई फुलेंनी भाजविरुद्ध जोरदार मोहिम उघडली होती. २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर त्या लोकसभेची निवडणूक जिंकल्या होत्या. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!