Aurangabad Crime : ‘त्याने ‘ मोबाईल मागितला, दिला नाही म्हणून हुज्जत झाली, भांडण इतके वाढले कि , एकाचा खून झाला !! बारा तासात आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश

औरंंंगाबाद : एमआयडीसी वाळुज परिसरातील पंढरपुरात सुंदर आर्केड शेजारच्या मोकळ्या मैदानात एका अनोळखी इसमाने फोन करण्यासाठी मोबाईल मागितला असता त्याचा शुक्रवारी रात्री१२च्या सुमारास दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. घटना शनिवारी (दि.७) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी आरोपीला वैजापूर तालुक्यातील डाकपिंपळगाव शिवारातून अटक केली आहे.घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मयताची मात्र अद्याप ओळख पटली नाही.
सचिन मधुकर पवार(२२) रा. डाक पिंपळगाव हल्ली मु.बकवालनगर असे अटक आरोपीचे नाव आहे.एमआयडीसी वाळुज परिसरातील पंढरपुर रोडवर एका २५ ते ३० वयोगटातील अनोळखी इसमाचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. अनोळखी इसम अर्धनग्न अवस्थेत असून सचिन ने त्याच्या डोक्यात जवळपास १५ ते २० किलो वजनाचा दगड टाकल्याने चेह-याचा पार चेंदामेंदा झाला आहे. वरील खुनाची कबुली आरोपी सचिन पवार ने दिली. सचिन हा १२वी सायन्स शिकलेला असून पुण्याच्या मास्क पाॅलिमर कंपनीसाठी तो औरंगाबादेत सुपरवायझरचे काम करतो.
पोलिसांना दिलेल्या जबाबात आरोपीने म्हटले आहे की, मित्राला पंढरपुरात सोडून सचिन बकवाल नगरात परत येत असतांना मयताने सचिन ला फोन करण्यासाठी मोबाईल मागितला.पण तो न दिल्यामुळे मयत चिडला व त्याने सचिन पवारशी हुज्जत घातली. त्यामुळे संतापलेल्या सचिनने मयताला धक्काबुक्की करंत सुंदर आर्केड जवळील मैदानात नेले व त्याच्या डोक्यात दगदड घातला.घटनास्थळी गुन्हे शाखेसह एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी अनोळखी इसमाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटी रूग्णालयात दाखल केला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी वाळुज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विजय घेरडे करीत आहेत.