Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : सोन्याची चैन हिसकावली , तिघाविरूध्द गुन्हा दाखल

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : जबिंदा इस्टेट ग्राऊंड येथे वॉकींग करण्यासाठी गेलेल्या नागरिकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करीत तिघांनी ३७ हजार ५०० रूपये किमतीची  सोन्याची चैन हिसकावून नेली. ही घटना ५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. राजेश पारगावकर सायंकाळच्या वेळी मुलीला (४८) रा.उल्कानगरी हे मुलीला ट्यूशनला नेऊन सोडण्याकरता गेले होते. क्लास संपण्यासाठी उशीर होता म्हणून ते पायी फिरत होते.  या मुळे जाणा-यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisements

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश शेषराव पारगांवकर (वय ४८, रा.उल्कानगरी) हे गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या पारगांवकर हे वॉकींग करीत असतांना त्यांच्यासमोर १८ ते २२ वयोगटातील तीन मुले आली. त्यांनी परगांवकर यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यामुळे पारगांवकर हे शिवीगाळ का करता असे विचारण्यासाठी गेले असता, तिघांनी पारगांवकर यांना धक्काबुक्की करीत त्यांच्या गळ्यातील ३७ हजार ५०० रूपये किमतीची  सोन्याची चैन हिसकावून घेत पायी पळून गेले.

Advertisements
Advertisements

याप्रकरणी राजेश पारगांवकर यांच्या तक्रारीवरून मारहाण करीत सोन्याची चैन हिसकावणा-या तिघाविरूध्द सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार ससाणे करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!