ताजी बातमी : मातोश्री वरील बैठक संपली , सेनेला हवंय मुख्यमंत्रीपद आणि जे काही ठरेल ते लेखी देण्याचा आग्रह

Pratap Sarnaik,Shiv Sena:In our meeting it was decided that like Amit Shah ji had promised 50-50 formula before LS polls,similarly both allies should get chance to run Govt for 2.5-2.5 years so Shiv Sena should also have CM.Uddhav ji should get this assurance in writing from BJP. pic.twitter.com/vyaFL1dVV4
— ANI (@ANI) October 26, 2019
उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेली ‘मातोश्री’वरील शिवसेनेच्या आमदारांची बैठक संपली असून मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली असल्याचे वृत्त आहे . अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आणि सत्तेत समान वाटा द्यावा, अशी मागणी शिवसेनेच्या आमदारांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली आहे . भाजपकडून लेख पत्र घेतल्याशिवाय पुढचा निर्णय घेऊ नये, अशीही मागणी शिवसेनेतून करण्यात आली आहे . भाजप ठरल्याप्रमाणे वागली नाही तर इतर पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरे आमदारांना संबोधित करताना म्हणाले. तर दिवाळीनंतर भाजप-शिवसेनेच्या नेत्यांमध्ये बैठक होईल. यात फॉर्म्युला निश्चित केला जाईल, असं भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दाने यांनी स्पष्ट केलंय.
उद्धव ठाकरे यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीवेळी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली होती. यावेळी महाराष्ट्रात सत्तेत समान वाटा दिला जाईल, असं आश्वासन शहा यांनी दिलं होतं. यामुळे मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्ष असावं अशी सेनेची मागणी आहे . भाजपकडून यासंदर्भात लेखी पत्र घेतल्याशिवाय पुढचं पाऊल टाकू नये, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेच्या आमदारांनी बैठकीत घेतलीय. तर सत्ता स्थापनेचे सर्वाधिक आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिलेत, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी बैठकीनंतर दिली. जवळपास एक तास शिवसेनेच्या नवनिर्वाचीत आमदारांची बैठक चाचली. मुख्यमंत्रीपदात समान वाटा मिळेपर्यंत पुढील चर्चा नको, अशी भूमिका आता शिवसेनेनं घेतलीय.
मोठा भाऊ क्षमतेवर ठरतो , दिवाळीनंतर निर्णय : दानवे
दरम्यान, शिवसेना भाजपच्या नेत्यांमध्ये दिवाळीनंतर बैठक घेतली जाईल. या बैठकीत सत्ता स्थापनेवर चर्चा होईल आणि त्यात फॉर्म्युला ठरवला जाईल. सत्तेत लहान भाऊ, मोठा भाऊ हे क्षमतेवरच ठरतं. पण चर्चा करून निर्णय घेतला जाईल. प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांच्या मागण्या असतात. तशी मागणी शिवसेनेतूनही करण्यात आलीय, असं भाजपचे नेते आणि खासदार रावसाहेब दानवे म्हणाले.