Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अहमदनगर : बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढलेल्या श्रीपाद छिंदमचे झाले काय ?

Spread the love

नगरचा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेला अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम याने बसपाच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवून आपली जनतेमधील ताकदीची चाचपणी करण्याचा प्रयत्न केला खरा पण या प्रयत्नात त्याला सपशेल अपयश आले असून त्याला केवळ २ हजार ९२३ इतकी मते मिळली आहेत.

मायावतींच्या बहुजन समाज पक्ष (बसपाने) छिंदमला अहमदनगर शहर या मतदारमधून निवडणुकीचे तिकीट दिले होते. मात्र या मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार संग्राम जगताप पुन्हा निवडून आले आहेत. तर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये शिसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर छिंदम चर्चेत आला होता. या प्रकरणामध्ये त्याला त्याचं पद गमवावं लागलं होतं. तसंच त्याला भाजपानेही पक्षाबाहेर हाकललं होतं. या सगळ्या गोष्टी घडूनही डिसेंबर २०१८ मध्ये झालेल्या अहमदगनर महापालिकेच्या निवडणुकीमध्ये छिंदम अपक्ष म्हणून लढला. विशेष म्हणजे छिंदम प्रभाग क्रमांक ९ मधून एक हजार ९७० मतांनी अपक्ष म्हणून निवडूनही आला. त्या नंतर छिंदमला उपरती आल्याने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण त्यांच्यासमोर नतमस्तक झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे व राज्याचे आराध्यदैवत असून त्यांच्यासमोर मी नतमस्तक होऊन हा विजय स्वीकारला असल्याचे त्याने माध्यमांसमोर सांगितले होते. त्यामुळे आता त्याने विधानसभा निवडणूक लढवण्याचाही निर्णय घेतला होता . मात्र त्याला विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ २ हजार ९२३ मते मिळाली आहेत. त्यामुळेच त्याचे डिपॉझिटही जप्त झाले आहे. परिणामी लोकांच्या मनातून छिंदम विषयीचा आकस गेलेला नाही असेच म्हणावे लागेल.

या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या जगताप यांना एकूण ८१ हजार २३१ मते मिळाली आहेत. शिवसेनेच्या राठोड यांना ७० हजार ७८ मते मिळाली आहेत. जगताप यांनी ११ हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने भाजपाला मोठा धक्का देत १२ पैकी सात जागांवर विजय मिळवला आहे. जेंव्हा कि १२ विरुद्ध श्यून्य असे आमदारकीचे गणित भाजपवासी राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले होते.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!