Viral Raosaheb Danve : खा. रावसाहेब दानवेंवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची नवाब मलिक यांची मागणी

भाजपाचे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्हायरल झालेल्या व्हिडीओसंदर्भात आपली जबाबदारी झटकली असली तरी त्यांच्यावरील टीका टिप्पण्णी चालूच आहे . या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला देत असून याबद्दल त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे.
केंदीय मंत्री रावसाहेब दानवे हे कायदा तोडण्याचा सल्ला आणि प्रोत्साहन देवून लोकांच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि अटक करावी, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्ये लक्ष घालून जे अशाप्रकारचे मंत्री आहेत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी देखील मलिक यांनी मागणी केली आहे.
एका बाजूला गोहत्येच्या नावावर मुस्लीम समाजाच्या विरोधात मॉबलिचिंगचे प्रकार घडत आहेत. दुसरीकडे मतांसाठी गोहत्या करा असं मुस्लीम समाजाच्या लोकांना सांगायचं, असेच मंत्री केंद्रात असतील तर देशात काय सुरु आहे? हे लक्षात येते, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.