Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Live महाराष्ट्र विधानसभा निकाल Live : आज निकालाचा दिवस : कोण किती पाण्यात , आदित्य ठाकरे विजयी , पवारांना दगा दिल्याने उदयन राजेंना मिळाला धडा

Spread the love

एम आय एम ला दोन जागा : धुळे – शाह फारुख अन्वर यांनी अनिल गोटे यांचा पराभव केला. तर मालेगाव सेंट्रल वरून मोहम्मद इस्माईल अब्दुल खलीक यांनी काँग्रेसचे उमेदवार असिफ शेख रशीद यांचा पराभव केला.

बीड मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर पराभूत. त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीकडून केवळ १७८० मतांनी जिंकले.

अहमदनगर: पारनेर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके विजयी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अखेर कल्याण ग्रामीणमधून उघडले खाते, प्रमोद पाटील यांचा विजय

इंदापूर मतदारसंघातून भाजपचे हर्षवर्धन पाटील यांचा विजय

शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांचा वरळी मतदारसंघातून ६७ हजार ६७२ मतांनी दणदणीत विजय, राष्ट्रवादीच्या सुरेश मानेंचा केला पराभव

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांचा मलबारहिल मतदारसंघातून विजय, काँग्रेसच्या हिरा देवासी यांचा पराभव

शरद पवार यांना दगा दिल्यामुळेच उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत विजयी झाल्यानंतर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया

काँग्रेसचे नाना पटोले यांचा साकोली मतदारसंघातून १२ हजार मतांनी विजय

शिवसेनेचे दीपक केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघातून विजय

भाजपच्या देवयानी फरांदे यांचा नाशिक मध्य मतदारसंघातून विजय

एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांचा मुक्ताईनगरातून पराभव

नगर शहर: संग्राम जगताप ११ हजार मतांनी विजयी

कोल्हापूर: शाहूवाडी मतदारसंघातील ‘जनसुराज्य’चे विनय कोरे विजयी

शेवगाव-पाथर्डी- भाजपच्या मोनिका राजळे १४ हजार मतांनी विजयी

अहमदनगर- राहुरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राजक्त तनपुरे २२ हजार ६०० मतांनी विजयी घोषित. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचा केला पराभव.

विधानसभा निवडणूक: काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सोलापूर मध्य मतदारसंघातून विजयी

मुंबई: शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दुपारी ५ वाजता घेणार पत्रकार परिषद

मुंबई: शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव नाही, पण त्यांच्यासोबत जाण्याची आमची नीती नाही- शरद पवार

अमरावतीः अचलपूरमधून बच्चू कडू चौथ्यांदा विजयी.

अमरावतीः राज्याचे कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे पराभवाच्या छायेत.मोर्शीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार यांना १० हजार ६५२ मतांची आघाडी.

नागपुरात भाजपला दोन जागांवर काँग्रेसचा धक्का. पश्चिम नागपूरमध्ये सुधाकर देशमुख तर उत्तरमध्ये डॉ. मिलिंद माने यांचा पराभव.

भाजपला नागपुरात पहिला धक्का, पश्चिम नागपूर मतदारसंघातून काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी.

वांद्रे पूर्व मतदारसंघातून काँग्रेसचे झिशान सिद्दीकी यांचा शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांवर विजय; ‘मातोश्री’च्या अंगणात काँग्रेसचा झेंडा फडकला

चांदिवली मतदारसंघातून २० व्या फेरीअखेर काँग्रेसचे नसीम खान ३५८ मतांनी आघाडीवर

शिवसेनेच्या सदा सरवणकर यांचा माहीममधून विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष

वरळीतून आदित्य ठाकरे यांची मोठ्या विजयाकडे वाटचाल; आदित्य यांना ६५ हजार १८८ मते तर, राष्ट्रवादीचे सुरेश माने यांना १३ हजार ९०३ मते

मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघातून अबू आझमी यांना निर्णायक आघाडी

मालाड पश्चिम मतदारसंघातील ९ व्या फेरीनंतर भाजपची आघाडी

दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मनीषा चौधरी यांना विजयी आघाडी; थोड्याच वेळात अधिकृत निकालाची घोषणा

बुलडाणाः शिवसेनेचे संजय गायकवाड विजयी. वंचितचा उमेदवार विजयराजे शिंदे दुसऱ्या नंबरवर.

नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस २० हजार मतांनी आघाडीवर

अमरावतीः तिवसा मतदारसंघात अकराव्या फेरीनंतर शिवसेनेचे राजेश वानखडे ४८७ मतांनी पिछाडीवर

नागपूर पूर्व: भाजपचे खोपडे १५,९०२ हजार मतांनी आघाडीवर

नागपूर पश्चिम: काँग्रेसचे विकास ठाकरे १० हजार मतांनी आघाडीवर

नागपूर दक्षिण: भाजपचे मोहन मते ५४०० मतांनी आघाडीवर

नागपूर उत्तर: काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत १६ हजारांनी आघाडीवर

नागपूर दक्षिण-पश्चिम: भाजपचे देवेंद्र फडणवीस २१७५८ हजार मतांनी आघाडीवर

नागपूर मध्य: भाजपचे विकास कुंभारे ३९९० मतांनी आघाडीवर

काटोल: राष्ट्रवादीचे अनिल देशमुख ९ हजार मतांनी आघाडीवर

विधानसभा निवडणूक: भोकरमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विजयी

विधानसभा निवडणूक: रावसाहेब दानवे यांचे जावई  हर्षवर्धन जाधव यांचा पराभव, शिवसेनेचे उदयसिंग राजपूत विजयी

विधानसभा निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड कळवा मुंब्रा मतदारसंघातून विजयी

विधानसभा निवडणूक: संगमनेर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात ६१ हजार मतांनी विजयी

विधानसभा निवडणूक: भोसरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार महेश लांडगे विजयी

विधानसभा निवडणूक: अमळनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भाईदास पाटील विजयी

विधानसभा निवडणूक: पुण्यातील हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी

शिवडी मतदारसंघातून शिवसेनेचे अजय चौधरी ३६ हजार मतांनी विजयी

दहिसर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मनीषा चौधरी यांना विजयी आघाडी; थोड्याच वेळात अधिकृत निकालाची घोषणा

मागठाणे विधानसभा मतदारसंघातून १५ व्या फेरीतील मतमोजणीनंतर शिवसेनेचे प्रकाश सुर्वे ३६ हजार मतांनी आघाडीवर

वांद्रे पूर्व मतदारसंघातील मतमोजणीच्या १४ व्या फेरीनंतर काँग्रेसचे झिशान सिद्दीकी आघाडीवर; महापौर महाडेश्वर पिछाडीवर

गोरेगाव विधानसभा मतदारसंघात चौदाव्या फेरीनंतर भाजपच्या विद्या ठाकूर आघाडीवर

कांदिवली पूर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल भातखळकर २१ हजार २२८ मतांनी आघाडीवर

मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसचे अमीन पटेल आघाडीवर

कुलाबा मतदारसंघात आठव्या फेरी अखेर भाजपचे राहुल नार्वेकर सहा हजार मतांनी आघाडीवर; काँग्रेसचे भाई जगताप दुसऱ्या स्थानी

मालाडमध्ये काँग्रेस आणि भाजप आघाडीवर

चांदिवलीत ११ व्या फेरीअखेर शिवसेनेचे दिलीप लांडे आघाडीवर; नसीम खान पिछाडीवर

कुडाळ मतदारसंघातून बाराव्या फेरीत वैभव नाईक ७,२३४ मतांनी आघाडीवर

अणुशक्ती नगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक विजयी

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजित पवार यांनी एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजयी

बारामती- अजित पवार यांच्या विरोधातील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

पळूस-कडेगाव मतदारसंघातून काँग्रेसचे विश्वजीत कदम १ लाख ५५ हजार मतांनी विजयी

कोल्हापूर शहर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव विजयी

त्र्यंबक-इगतपुरी मतदारसंघातून काँग्रेसचे हिरामण खोसकर विजयी

शिवडी मतदारसंघाची मतमोजणी संपली, शिवसेनेचे विद्यमान आमदार अजय चौधरी आघाडीवर; लवकर निकाल जाहीर होणार

औरंगाबाद पश्चिमः ९ व्या फेरीत संजय शिरसाठ यांना ३३ हजार मतांची आघाडी.

औरंगाबाद मध्यः १३ व्या फेरीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना ६ हजार २४७ मतांची आघाडी

कन्नडः १५ व्या फेरीत शिवसेनेचे उदयसिंग राजपूत यांना ११ हजार मतांची आघाडी.

जालनाः काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल हे आठव्या फेरीनंतर ७७९८ मतांनी आघाडीवर. सेनेचे अर्जुन खोतकर पिछाडीवर.

वैजापूर मतदारसंघात शिवसेनेचे उदयसिंह राजपूत हे १७ व्या फेरी अखेर३३ हजार मतांनी आघाडीवर

औरंगाबाद मध्यः चौदाव्या फेरी अखेर पर्यंत शिवसेना उमेदवार जैस्वाल यांना ४६ हजार ४२५ मते तर एमआयएमच्या उमेदवाराला ४५ हजार ३८२ मते

जालनाः घनसावंगी मतदारसंघात सातव्या फेरीअखेर शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना ३ हजार ९७ मतांची आघाडी. राष्ट्रवादीचे राजेश टोपे पिछाडीवर.

लातूर ग्रामीण मतदारसंघात नोटा दुसऱ्या स्थानावर. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव धीरज देशमुख हे २७ हजार ७६३ मते घेऊन आघाडीवर.

नांदेडः भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ३९ हजार मतांची आघाडी.

लातूर ग्रामीण मतदारसंघात ‘नोटा’ मते दुसऱ्या क्रमांकावर

परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे १८ हजार मतांनी पिछाडीवर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेंनी घेतली मोठी आघाडी

येवला मतदारसंघ- चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ १०२५७ मतांनी आघाडीवर

मुंबई अपडेट :

वरळीतून पाचव्या फेरी अखेर आदित्य ठाकरे यांना २७ हजार ९७४ मते, राष्ट्रवादीचे सुरेश माने यांना ४७४९ मते

धारावी मतदारसंघात नवव्या फेरीअखेर काँग्रेसच्या वर्षा गायकवाड ७०८६ मतांनी आघाडीवर

कुडाळ मतदारसंघातून बाराव्या फेरीत वैभव नाईक ७,२३४ मतांनी आघाडीवर

वांद्रे पश्चिम मतदारसंघातून भाजपचे आशिष शेलार २७ हजार ७६९ मतांनी आघाडीवर

गोरेगाव विधानसभा मतदारसंघात नवव्या फेरीअखेर भाजपच्या विद्या ठाकूर आघाडीवर; विद्या ठाकूर यांना २९७७३ मते, काँग्रेसचे युवराज मोहिते १२४६८ मतांसह दुसऱ्या स्थानी

चांदिवली मतदारसंघातून पाचव्या फेरीनंतर शिवसेनेचे दिलीप लांडे आघाडीवर, काँग्रेसचे नसीम खान पिछाडीवर

मुंबादेवी मतदारसंघातून दुसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे अमिन पटेल ३३४७ मतांनी आघाडीवर

कोथरुड मतदारसंघातील मतमोजणी निवडणूक अधिकाऱ्यांनी थांबवली, ईव्हीएमचा नंबर आढळला वेगळा, मनसे उमेदवाराने घेतला होता आक्षेप

परळी विधानसभा मतदारसंघातील निकाल इतिहास घडवेल- राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांचे वक्तव्य

उदयनराजे ८१ हजारांनी पिछाडीवर

परळीः धनंजय मुंडे यांना १८ हजार मतांची आघाडी.

औरंगाबाद मध्यः शिवसेनेचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांना ३९ हजार ३६५ मतांची आघाडी

औरंगाबाद पूर्वः भाजपचे राज्यमंत्री अतुल सावे हे २३ हजार ३१४ मतांनी पिछाडीवर

नांदेडः भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ३९ हजार मतांची आघाडी.

मुंबईत महायुतीची मुसंडी; काँग्रेसची पिछेहाट

हरिभाऊ बागडे आघाडीवर – सहावी फहेरी

औरंगाबाद पश्चिम : संजय शिरसाठ (१२,८१३)

औरंगाबाद पूर्व : डॉ. गफ्फार काद्री आघाडीवर (२२,६७७)

औरंगाबाद मध्य : प्रदिप जैस्वाल आघाडीवर (३१, ३६५)

भोकरदन : संतोष दानवे आघाडीवर

पुण्यातील ८ पैकी ३ जागांवर काँग्रेस राष्ट्रवादी पुढे

जालना : पाचव्या फेरी , काँग्रेसचे कैलास गोरंट्याल आघाडीवर ; शिसेनेचे अर्जुन खतकर पिछाडीवर

नाशिक – भाजपच्या देवयानी फरांदे आघाडीवर

अहमदपूर : राष्ट्रवादी बाबासाहेब पाटील आघाडीवर

लोकसभा : साताऱ्यातून उदयनराजे १४ हजार मतांनी पीछाडीवर

औरंगाबाद पूर्वः पाचव्या फेरी अखेर एमआयएमचे डॉ. कादरी यांना ३७०३८ मतांची आघाडी

परतूरः भाजपाचे बबनराव लोणीकर सहाव्या फेरी अखेर ६६९२ मतांनी आघाडीवर

फुलंब्रीः पाचव्या फेरीअखेर भाजपाचे हरिभाऊ बागडे सहा हजार २८४ मतांनी आघाडीवर

औरंगाबाद: सातव्या फेरी अखेर शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल ३० हजार ६३९ मतांनी आघाडीवर

जालनाः जालनामधून शिवसेनेचे अर्जुन खोतकर ४०० मतांनी आघाडीवर. परतूरमधून बबनराव लोणीकर २५०० मतांनी आघाडीवर. घनसावंगीमधून राष्ट्रवादीचे राजेश टोपे आघाडीवर. बदनापूरमधून भाजपचे नारायण कुचे आघाडीवर

औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे अतुल सावे चौथ्या फेरी अखेर ३०१५१ मतांनी पिछाडीवर

सिल्लोड शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना सहाव्या फेरीत १३ हजार ५९४ मतांची आघाडी

औरंगाबाद: सहाव्या फेरीत सेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना २५ हजार ४६१ मतांची आघाडी

औरंगाबाद मध्य  प्रदीप जैस्वाल ३० हजार मतांनी आघाडीवर

औरंगाबाद पूर्व एमआयएमचे डॉ. गफ्फार कादरी ३० हजार मतांनी आघाडीवर

औरंगाबाद पश्चिम – संजय शिरसाठ आघाडीवर

औसाः मुख्यमंत्री यांचे विश्वासू सहकारी अभिमन्यू पवार आघाडीवर

जालना: शिवसेना उमेदवार अर्जून खोतकर यांना ४०० मतांची आघाडी

जालन्यात शिवसेना, परतूरमध्ये भाजप, घनसावंगीत राष्ट्रवादी तर बदनापूरमध्ये भाजप आघाडीवर.

औरंगाबाद: भाजपचे उमेदवार प्रशांत बंब पहिल्या फेरीत २४०१ मतांनी आघाडीवर

बीड: शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर पिछाडीवर, पुतणे राष्ट्रवादीचे उमदेवार संदीप क्षीरसागर हे ३०० मतांनी आघाडीवर

सिल्लोड शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांना सहाव्या फेरीत १३ हजार ५९४ मतांची आघाडी

औरंगाबाद: सहाव्या फेरीत सेनेच्या प्रदीप जैस्वाल यांना २५ हजार ४६१ मतांची आघाडी

औरंगाबाद पश्चिम – दुसरी फेरी संजय शिरसाठ आघाडीवर (८१६८) ; राजू शिंदे (४०६८) ; अरुण बोर्डे (२००२) ; संदीप शिरसाठ (१९८९)

फुलंब्री औरंगाबादेत हरिभाऊ बागडेंना ५३१७, तर कल्याण काळेंना ३३११

भोकर मतदारसंघातून अशोक चव्हाण १७ हजार मतांनी आघाडीवर

परळीमधून धनंजय मुंडे यांना ६ हजार मतांची आघाडी. पंकजा मुंडे सुरुवातीपासून पिछाडीवर.

परतूर मधून भाजपचे बबनराव लोणीकर ३१४९ मतांनी आघाडीवर

वरळी – अधित्य ठाकरे ११,००० मतांनी आघाडीवर

सोलापूर दाक्षिण – सहकार मंत्री सुभाष देशमुख आघाडीवर

म्हाडा – राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे ३४,००० मतांनी आघाडीवर

वयतमाळ राळेगाव – भाजपचे अशोक उईके आघाडीवर

यवतमाळ आर्णी – काँग्रेसचे शिवाजीराव मोघे अगदीवर

यवतमाळ कुसद – राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक आघाडीवर

माळशिरस – उत्तम जाणकार आघाडीवर

शहादा – राजेश पडवी आघाडीवर

कल्याण ग्रामीण – मनसेचे राजू पाटील आघाडीवर

परळी – पाचव्या फेरी अखेर धनंजय मुंडे (४४१७) मतांनी आघाडीवर

बांद्रा पश्चिम – आशिष शेलार आघाडीवर

कुडाळ मालवण – वभाव नाईक आघाडीवर

बारामती – अजितपवर आघाडीवर

शेवगाव पाथर्डी – राष्ट्रवादीचे प्रताप ढाकणे आघाडीवर

सातारा माण – जयकुमार गोरे आघाडीवर

धारावी – वर्षा गायकवाड आघाडीवर

जत – काँग्रेसचे विक्रम सिहं आघाडीवर

विक्रोळी – सुनील राऊत पाचव्या फेरीत ५,००० मतांनी आघाडीवर

औसा – अभिमन्यू पवार आघाडीवर

परळीमधून पंकजा मुंडे पिछाडीवर, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडेंनी घेतली आघाडी

सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उदनराजे भोसले पिछाडीवर

बारामतीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आघाडीवर

वरळी मतदारसंघातून शिवेसनेचे आदित्य ठाकरे ६१०१ मतांनी आघाडीवर

पंढरपूरमधून भारत भालके आघाडीवर

बडनेरामधून रवी राणा आघाडीवर

मिरजमधून सुरेश खाडे आघाडीवर

कोपरी-पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आघाडीवर

बार्शीमधून राजेंद्र राऊत आघाडीवर

ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजय वडेट्टीवार आघाडीवर

परळी मतदारसंघातून पंकजा मुंडेनी घेतली आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे पिछाडीवर

भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत प्रतिष्ठेता मतदारसंघ असलेल्या परळीत पंकजा मुंडे पिछाडीवर आघाडी

कणकवलीतून नितेश राणे, सावंतवाडीतून दीपक केसरकर आघाडीवर

कोथरुडमधून भाजपचे चंद्रकांत पाटील आघाडीवर

बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे १ हजार मतांनी पिछाडीवर

जामनेरमधून भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन आघाडीवर

विधानसभेच्या २८८ जागांसह साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी होणार

मतमोजणीसाठी राज्यात २५ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांची नेमणूक

दुपारी साधारणत: १२ वाजेपर्यंत राज्याच्या नव्या विधानसभेचं चित्र स्पष्ट झालेलं असेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!