Aurangabad Crime : पुण्यात महिलेचा खून करून औरंगाबादला आलेला तरूण गजाआड

औरंंंगाबाद : पुणे येथे महिलेच्या डोक्यात दगड घालून तिची निर्घुणपणे हत्या करून औरंगाबादेत वास्तव्यासाठी आलेल्या आतीष कोंडीराम काळे (वय २६, रा.बालाजीनगर, भोसरी, पुणे,ह.मु.संसारनगर,औरंगाबाद) याला क्रांतीचौक पोलिसांनी बुधवारी (दि.१६) गजाआड केले.आतीष काळे याने लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणा-या कावेरी नावाच्या महिलेचा खून १४ ऑक्टोबर २०१९ रोजी केला होता. त्यानंतर तो औरंगाबादला संसारनगरात राहणा-या नातेवाईकाकडे आला होता. क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राहुल सुर्यतळ, सहाय्यक फौजदार नसीम खान, सय्यद सलीम, चंद्रकांत पोटे, राजेश फिरंगे, राजेश चव्हाण, मंगेश मनोरे, संतोष रेड्डी, हणमंत चाळणेवाड, देवानंद मरसाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.