Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उद्धव ठाकरे यांच्यावर असभ्य वक्तव्य करणा-या हर्षवर्धन जाधवविरूध्द पोलिसात तक्रार

Spread the love

औरंंंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ठाकरे कुटुंबीयाच्या विरोधात असभ्य वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा या मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीने बुधवारी (दि.१६) क्रांतीचौक पोलिसांना दिले. कन्नड विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी प्रचार सभेत ठाकरे वुुंâटुंबीयाच्या विरोधात असभ्य वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिकात तिव्र संतापाची लाट उसळली आहे. क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक उत्तम मुळक यांना निवेदन देणा-या शिष्टमंडळात शिवसेना महिला आघाडीच्या सुनिता आऊलवार, सुनिता देव, अंजली मांडवकर, अनिता मंत्री, मिरा राजकुमार पाटील, किरण शर्मा, अरुणा भाट्टी, मिरा चव्हाण, सुवर्णा राणे, कांता गाढे, स्मिता जोशी, राजश्री पोकळे आदींचा समावेश होता.

दरम्यान हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध शिवसेनेचे उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर डांगे यांनीही  मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी कन्नड विधानसभा मतदारसंघातील चिंचोली लिंबाजी येथे प्रचार सभेत बोलताना जाधव यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी जातीय भावना भडकावल्याप्रकरणी जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.

काय म्हणाले होते हर्षवर्धन जाधव ?

औरंगाबाद आणि सिल्लोडच्या सभेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी  लोकसभेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या पराभवावरून बोलताना हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे हिरवा निवडून आला असे वक्तव्य केले होते . त्याचे उत्तर देताना कन्नड मतदार संघातील आपल्या प्रचार सभेत बोलताना हर्षवर्धन जाधव यांनी माझ्यामुळे खैरेंचा पराभव  झाल्याचे म्हणता , मुस्लिमांचा भाषणातून द्वेष  करता आणि कन्नड मधून एका मुस्लिम उमेदवाराला शिवसेनेची उमेदवारी देता ? असा सवाल उपस्थित करून मुस्लिमांचे इतकेच जर तुम्हाला वावडे आहे तर मग अब्दुल सत्तार काय तुमच्या आईचा नवरा लागतो काय ? अशी जाहीर टीका केली होती.

या निवेदनाचा निषेध करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेच्या महिला आघाडीने केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!