Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संसाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली आणि सात महिलांनी तो आपलाच पती असल्याचा दावा केला आणि पोलिसही चक्रावले !!

Advertisements
Advertisements
Spread the love

कधी कुठे काय घडेल सांगता येत नाही. अशीच एक घटना हरिद्वार येथे घडली असून या घटनेमुळे पोलिसही चक्रावून गेले आहेत. त्याचे असे झाले कि ,  एका व्यक्तीने संसाराला  आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आणि त्याचा मृतदेह आपल्याला मिळवा, कारण आपणच त्याची पत्नी आहोत, असा दावा चक्क पाच बायकांनी केला आहे. त्यामुळे तो मृतदेह कोणाच्या ताब्यात द्यायचा हे पोलिसांना कळेनासे झाले आहे.

Advertisements

विशेष म्हणजे त्या प्रत्येकजणींनी आपल्या नवर्‍याचे अन्य कोणा स्त्रीसोबत लग्न झाले होते, हे माहित नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे या प्रकरणाला सामोरे जायचे कसे असा प्रश्न  पोलिसांना पडला आहे.  अखेर त्या व्यक्तीवर कसे बसे अंत्यसंस्कार झाले खरे पण अंत्यसंस्कार केल्यानंतरहा  आणखी दोन बायकांनी पोलीस ठाण्यात येऊन तो आपलाच पती असल्याचा दावा केला.  त्यांनीही तो आपला पती असून त्याचा मृतदेह ताब्यात देण्याची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी आता हे प्रकरण मिटवण्यापूर्वी अजून काही दिवस वाट बघायचे ठरवले आहे. आणखी काही महिला पुढे येतात कि काय असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी सांगितले कि , मयत पवन कुमार हा रविदास बस्ती येथे रहात होता. तो व्यवसायाने ड्रायव्हर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने रविवारी रात्री विष प्राशन केले. त्याला त्याच्या पत्नीने बेशुद्ध अवस्थेत नजीकच्या हॉस्पिटलमध्ये आणले. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी केलेल्या तपासात पवन कुमार हा आर्थिक अडचणीत सापडल होता. त्याला फारसे मित्र नव्हते. तसेच तो साधे आयुष्य जगत होता. त्याने आत्महत्या का केली याचे कारण कळू शकलेले नाही. ज्या स्त्रीने त्याला हॉस्पिटलमध्ये आणले ती स्वत:ला पवन कुमारची पत्नी म्हणून घेत होती. पोलिसांनी पवनकुमारचे शव ऑटोप्सीसाठी जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे. त्याच्या बँक अकाऊंटमध्ये एकही पैसा नाही तसेच तो भाड्याच्या घरात रहात होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!