कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात तीन संशयितांना ४ ऑकटोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणांत पोलिसांची धरपकड चालूच असून न्यायालयासमोर उभ्या करण्यात आलेल्या तिघा संशयितांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिन्ही संशयितांची पुणे आणि मुंबईतील कारागृहात रवाना करण्यात आली आहे.
एस आय टी च्या तपासात कॉम्रेड पानसरे यांच्या हत्याप्रकरणात आणखी तिघा संशयितांची नावं पुढे आली होती. एसआयटीने एका बंद लिफाफ्यातून उच्च न्यायालयाकडे ही नावे सादर केली होती. त्यानंतर या संशयितांची धरपकड करण्यात आली आणि त्यांची चौकशी करण्यात आली. आज त्यांना कोर्टासमोर हजर करण्यात आले असता त्यांना ४ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.