पोलिसांच्या आॅनलाईन हट्टापायी यंदा गणेश मंडळाची नोंदणी कमी झाली – पवार

औरंगाबाद – पोलिसांच्या आनलाईन हट्टापायी या वर्षी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अधिकृत नोंदणी कमी झाल्याचा आरोप सार्वजनिक गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केला आहे.
गेल्यावर्षी ७६१ गणेश मंडळांनी नोंदणी केली होती तर यावर्षी केवळ ६०१ गणेश मंडळांच्या नोंदणी झाल्या आहेत.तर शहरात घरगुती ५लाख ४० हजार गणेश मूर्तींची स्थापना झाली आहे.असै पोलिसआयुक्तालयातील सूत्रांनी सांगितले.यावर्षी गणेश मंडळांनी आॅनलाईन नोंदणी करावी असे आदेश पोलिसआयुक्तालयाने जारी केल्यावर आॅनलाईन पध्दतीने नोंदणी सुरु असतांना पोलिसआयुक्तालयाचे संकेतस्थळ वारंवार हॅक होत होते.
या विषयी खुलासा करतांना पोलिस उपायुक्त मीना मकवाना म्हणाल्या की, यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आॅनलाईन परवानगी घेणे बरेच अडचणीचे ठरले.तरीही ज्या गणेश मंडळांना नोंदणी करता आल्या नाहीत त्यांना पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांकडून नियमित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.पण जे यावर्षी नवीनच गणेश मंडळे स्थापन करंत आहेत. त्यांच्याविषयी सुध्दा काही तरतूद करता येईल का हे तपासले जात आहे.