Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दक्ष नागरिकाच्या मदतीने दोन मोबाईल आणि सोन्याची चैन हिसकावणारे दोघे अटकेत एक ताब्यात

Spread the love

औरंगाबाद – बाबा पेट्रोलपंप परिसरात दोन मोबाईल आणि दोन तोळ्याची सोन्याची चैन हिसकावणारे दोन चोरटे व अल्पवयीन चोरटा दक्ष नागरिकाच्या मदतीने ताब्यात घेतला आहे. वरील दोघांना कोर्टाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.तर दक्ष नागरीक रविदास डोंगरे याचा क्रांतीचौक पोलिसांनी सत्कार केला आहे.

सोलोमन कांबळे(२२) रा. छावणी,आणि दिनेश पाटोळे(२५) रा. गणेशनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत.त्यांच्या ताब्यातून ७० हजार रु.चा मुद्देमाल जप्त केला आहे. या पैकी सोलोमन कांबळै हा रिक्षाचालक असून रेकाॅर्डवरचा गुन्हेगार आहे. तर दिनेश पाटोळे हा मिस्री काम करतो.तर एक चोरटा अल्पवयीन आहे.

सोमवारी रात्री साडे आठच्या सुमारास एका खाजगी बॅंकेत काम करणारै अशोक सर्वेश हे भाग्यनगरातून पायी जातांना वरील तिघांनी पाठीमागून येत सर्वेश यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची चैन व एक मोबाईल हिसकावला याच दरम्यान रविदास डोंगरे यांनी ही घटना पाहून धावत जाऊन अल्पवयीन चोरटा पकडून पोलिसांच्या हवाली केला. एपीआय राहूल सूर्यतळ यांनी अल्पवयीन चोरट्याला विश्र्वासात घेत त्त्याच्या दोन साथीदारांची नावे विचारली व त्यांना त्वरीत अटक केली.याच वेळेस जीवन पालवे(२१) रा. बीडबायपास यांचाही मोबाईल तिघांनी बाबा पेट्रोलपंप परिसरात हिसकावल्याची तक्रार देण्यासाठी ते क्रांती चौक पोलिस ठाण्यात आले होते. अल्पवयीन चोरट्याला डोंगरेंनी पकडून क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आणताच पालवेंनी मोबाईल याच मुलाने व त्याच्या दोन साथीदाराने हिसकावल्याचे पोलिसांना सांगितले. वरील कारवाई पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सूर्यतळ, पोलिस कर्मचारी संतोष रेड्डी, राजेश मनोरे, मनोज चव्हाण यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!