Gujrat : सुरत, वडोदरातही पावसाचा धडाका ; पूरसदृश परिस्थिती , विमान, रेल्वे सेवेवर मोठा परिणाम

#Vadodararain has affected one & all. RPF distributed 400 biscuit packets, 150 candles, 450 bottles of water, 450 packets of Milk to 450 stranded people in Viswamitri Rly colony.
Timely supply of milk was much appreciated by colony residents. pic.twitter.com/1douyTGFX8— Western Railway (@WesternRly) August 3, 2019
महाराष्ट्रातील मुंबई , नाशिक बरोबरच गुजरातमधील सुरत, वडोदराला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. दक्षिण गुजरातमध्ये शनिवारी पुरस्थिती निर्माण झाली आहे. सुरतमध्ये सर्वत्र पाणी साचल्याने शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून याचा विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. पावसामुळे तापी आणि विश्वमित्रा नद्यांना पुर आला असून दक्षिण गुजरातमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत सात जण वाहून गेले आहेत. तसेच पावसाची संततधार कायम राहिल्याने वडोदरातील हवाई वाहतूक बंद करण्यात आली असून ही वाहतूक अहमदाबादला वळवण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे. आतापर्यंत तब्बल ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून शहरातील बससेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.
वडोदरातील विश्वमित्र कॉलनीमध्ये अडकलेल्या नागरिकांना रेल्वे दलाच्या जवानांनी मदत केली आहे. रेल्वे दलाच्या जवानांनी नागरिकांना बिस्कीट, पाण्याच्या बाटल्या, दुधाची पाकिटे पुरवली आहे. सुरतमध्येही अशीच परिस्थीती असून एअर इंडिया आणि स्पाईस जेटची विमाने अहमदाबादला वळवण्यात आली आहे. अहमदाबादमध्ये माणिक चौक परिसरात घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर आगीत सापडलेल्या दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.