सीसीडीचे मालक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला
Advertisements
Advertisements
‘कॅफे कॉफी डे’चे मालक आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई व्ही जी सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. जवळपास 36 तासांनंतर मंगळुरु येथील नेत्रावती नदीत सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला आहे. काही वेळात सिद्धार्थ यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन होणार आहे. त्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येणार आहे.
Advertisements
https://mobile.twitter.com/ANI/status/1156381351714742273
Advertisements
Advertisements
सिद्धार्थ सोमवारपासून बेपत्ता होते. पोलीस त्यांचा गेल्या 24 तासांपासून शोध घेत होते. काल पोलिसांनी नेत्रावती नदीजवळील परिसरात त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. यासाठी जवळपास 200 हून अधिक पोलीस, शोधपथक आणि 25 बोटींची मदत घेण्यात आली.
