शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
Advertisements
Advertisements
बीडमध्ये अत्यंत थरारक घटना घडली. शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बीडपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वासनावाडी येथे हे तिहेरी हत्याकांड घडले.
Advertisements
शेतीच्या वादातून किरण काशिनाथ पवणे, दिलीप काशिनाथ पवणे आणि प्रकाश काशिनाथ पवणे या तिघांची हत्या झाली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या प्रकरणी पंचनामा दाखल केला असून हल्लेखोरांचा तपास करत आहेत.
Advertisements
Advertisements
