Bihar : मॉबलिंचिंग : चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांची हत्या

Bihar: Three people were beaten to death by locals in Baniyapur, Saran on suspicion of cattle theft, today morning. Bodies sent for postmortem by police, investigation underway. pic.twitter.com/wNKJIYgfn5
— ANI (@ANI) July 19, 2019
बिहारमध्ये मॉब लिंचिंगची घटना घडली आहे. छपरा येथे जनावर चोरी केल्याच्या संशयातून जमावाने तिघांची बेदम मारहाण करत हत्या केली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तपासही सुरु केला आहे. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, छपरा येथील बनियानपूर येथे शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांनी चार जणांना चोरीच्या संशयातून पकडलं होतं. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना यासंबंधी कोणतीही माहिती न देता त्यांच्यावर हल्ला केला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण इतकी करण्यात आली होती की दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर जनावर चोरी करण्यासाठी एका घरात घुसले होते, तेव्हा त्यांना पकडण्यात आलं असा दावा ग्रामस्थांनी केला आहे. यानंतर सर्वांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी याप्रकरणी दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल असं सांगितलं आहे.