Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : कोळपेवाडी दरोडा प्रकरण, दोन मास्टरमाईंड ११ महिन्यानंतर गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Spread the love

औरंगाबाद गुन्हे शाखेची कामगिरी, मिटमिटा येथून अटक

नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात असलेल्या कोळपेवाडी येथील दरोड्यातील श्रीमंत्या उर्फ  योगेश ईश्वर काळे (वय ४५, रा.मिटमिटा) याच्यासह  प्रिया जितू उर्फ  जितेंद्र भोसले या महिलेला गुन्हे शाखा पोसिलांनी तब्बल ११ महिन्यांनी बेड्या ठोकून अहमदनगर पोलिसांच्या हवाली केले. १९ ऑगस्ट २०१८ रोजी पपड्या काळे याच्या टोळीने आपल्या २० ते २२ साथीदारांच्या मदतीने कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकला होता. त्यावेळी पपड्या काळे याने लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक शाम धाडगे यांची गोळी झाडून हत्या केली होती. तेव्हापासून या गुन्ह्यातील मास्टरमाईंड श्रीमंत्या उर्फ  योगेश काळे, प्रिया जितू  उर्फ जितेंद्र भोसले हे दोघे फरार होते अशी माहिती गुन्ह शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे दारोडा टाकून सुमारे सात किलो सोने व तीन किलो चांदी असा सुमारे दोन कोटी रुपयांचा ऐवज लुटून दुकानमालकांची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी तीन सराफासह १३ आरोपींना अटक केली. परंतु गुन्ह्यातील मास्टरमाईंड कुख्यात आरोपी पपड्या उर्फ संजय उर्फ राहुल व्यंकटी उर्फ महादू उर्फ महादेव उर्फ गणपती काळे उर्फ तुकाराम चव्हाण हा फरार होता. मेहकर तालुक्यातील पारधी वस्तीवर छापा मारून पोलिसांनी २४ सप्टेंबर १८रोजी पपड्या काळे याच्या मुसक्या आवळल्या होत्या.
दरम्यान, कोळपेवाडी दरोडा प्रकरणातील श्रीमंत्या उर्पâ योगेश काळे व प्रिया जितु उर्फ  जितेंद्र भोसले हे मिटमिटा परिसरात आले असल्याची गुन्हे शाखेला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ.नागनाथ कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मधुकर सावंत, उपनिरीक्षक योगेश धोंडे, अमोल देशमुख, विजय पवार, नगर स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रोहन खंडागळे आदींच्या पथकाने मिटमिटा येथून श्रीमंत्या उर्फ योगेश काळे, प्रिया जितू उउर्फ  जितेंद्र भोसले याला अटक करून नगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!