News Update Live : गल्ली ते दिल्ली , महत्वाच्या बातम्या , एक नजर : शिर्डी, नवी मुंबईत हत्याकांड , एकाच कुटुंबातील तिघांचा खून , दोन गंभीर

आज (शनिवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाल्याचे वृत्त समजताच शिर्डीत खळबळ उडाली आहे. याशिवाय याच कुटुंबातील दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर संस्थान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली आहे. ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादातून या हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या विषयी पोलिसांनी सांगितले कि , आज सकाळी साडे सहाच्या सुमारास अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्याने ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले. तसंच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीचीदेखील कोयत्यानं हत्या केली. पन्हाळे यांच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर (वय ३५ वर्षे) आणि तावू ठाकूर (वय १८वर्षे) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.
नवी मुंबईतही तिहेरी हत्याकांड
अहमनगरमधील शिर्डी येथील तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरले असताना नवी मुंबईतील तुर्भे एमआयडीसीतील बोनसरी गावात भंगाराच्या गोदामातील तीन कामगारांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. गोदामतील भंगाराच्या चोरीच्या उद्देशानं त्यांची हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. बोनसरी गावात अनधिकृतपणे चालत असलेल्या भंगाराच्या गोदामामध्ये ही हत्या करण्यात आली. डोक्यात जड वस्तू घालून तसंच चाकूचे वार करून या तीन कामगारांची हत्या करण्यात आली आहे. हत्या केल्यानंतर या तीन कामगारांचे मृतदेह याच भंगाराच्या गोदामात लपवण्यात आले आले होते. आज (शनिवारी) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
नागपुरातही युवतीची क्रूर हत्या
दरम्यान, नागपुरातील सावली फाटा येथे तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणीचा चेहरा विद्रुप केला गेल्यामुळे या तरुणीची ओळख पटवणे कठीण झाले आहे. या तरुणीच्या तोंडावर अॅसिड फेकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवाय या तरुणीचा एक हात तोडून टाकण्यात आल्याचेही पोलिसांना आढळून आले आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतर या प्रकरणावर प्रकाश पडणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या …
औरंगाबाद : चितेगाव येथे मारहाणीत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचे घाटी शवागरासमोर ठिय्या.
वर्धा : प्रेमसंबंधातून पुलगाव येथे युवकाची निर्घृण हत्या
पद्मश्री पुरस्कार विजेते सदाशिव गोरक्षकर यांचं निधन
औरंगाबाद: चोरट्यांनी एटीएम मशिन पळवलं; २५ लाखांची रक्कम चोरीला
अहमदनगर: तिहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली; एकाच कुटुंबातील तिघांची हत्या
गोवा मंत्रिमंडळाचा आज विस्तार; काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना मंत्रिपदं मिळण्याची शक्यता
उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर; १५ जणांचा मृत्यू; १३३ घरं कोसळली