Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मतदानाआधीच भाजपचा विजयघोष, ‘बिनविरोध’ यशाचा चौकार

Spread the love

कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळेमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी, निवडणूक होण्याआधीच उघडलं विजयाचं खातं. पक्षप्रवेशानंतर अवघ्या एका दिवसात नगरसेवक बनण्याचा विक्रम

राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेत मतदानाआधीच विजयाची जोरदार सुरुवात केली आहे. कल्याण-डोंबिवली, पनवेल आणि धुळे या तीन महापालिकांमध्ये भाजपचे एकूण चार उमेदवार बिनविरोध निवडून आले असून, यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपच्या खात्यात विजयाची नोंद झाली आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत रेखा चौधरी आणि आसावरी नवरे या दोघी बिनविरोध निवडून आल्या आहेत. रेखा चौधरी या दुसऱ्यांदा नगरसेविका झाल्या असून, आसावरी नवरे यांची ही पहिलीच टर्म आहे. कोणत्याही विरोधी उमेदवाराने अर्ज न भरल्याने दोघींचा विजय आधीच निश्चित झाला.

पनवेल महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 (ब) मधून नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर धुळे महानगरपालिकेत घडलेली घटना विशेष चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी शेवटच्या क्षणी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्या पत्नी उज्वला भोसले यांना भाजपचं तिकीट देण्यात आलं.

अर्ज छाननीदरम्यान उज्वला भोसले यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने त्या धुळे मनपातील पहिल्या बिनविरोध नगरसेविका ठरल्या. विशेष म्हणजे एकाच दिवशी भाजपमध्ये प्रवेश आणि दुसऱ्याच दिवशी नगरसेविका बनण्याचा दुर्मिळ विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी बंडखोरी तर काही ठिकाणी मतदानाआधीच बिनविरोध विजय असे चित्र दिसत असून, भाजपने सुरुवातीलाच राजकीय आघाडी घेतल्याचं स्पष्ट होत आहे.

Shop On Amazon 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!