ISROचा ‘बाहुबली’ पुन्हा सज्ज; अवघ्या 90 सेकंदांच्या विलंबानंतर ऐतिहासिक सॅटेलाइट यशस्वीपणे अवकाशात
अवकाशातील कचरा आणि इतर सॅटेलाइट्सशी टक्कर टाळण्यासाठी ISROने प्रक्षेपणाचा वेळ बदलला.
LVM3 रॉकेटद्वारे जगातील सर्वात मोठ्या कमर्शियल सॅटेलाइटपैकी एकाचे प्रक्षेपण.
या मिशनमुळे थेट स्मार्टफोनवर सॅटेलाइट इंटरनेटची सुविधा उपलब्ध होणार.
भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (ISRO) ने आज आपल्या सर्वात शक्तिशाली आणि विश्वासार्ह LVM3 ‘बाहुबली’ रॉकेटद्वारे एक महत्त्वाचा सॅटेलाइट अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित केला. सुरुवातीला हे प्रक्षेपण सकाळी 8.54 वाजता होणार होते, मात्र अवघ्या 90 सेकंदांचा रणनीतिक विलंब करत 8.55 वाजून 30 सेकंदांनी रॉकेटला उड्डाण देण्यात आले.
ISROने स्पष्ट केलं की, रॉकेट ज्या मार्गाने अवकाशात जाणार होतं, त्या कक्षेत आधीपासून असलेला अवकाशातील कचरा (Space Debris) किंवा इतर सॅटेलाइट्सशी टक्कर होण्याची शक्यता होती. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी वेळेत हा बदल करण्यात आला. अवकाशशास्त्रात या परिस्थितीला ‘कंजंक्शन’ असं म्हटलं जातं.
या मोहिमेतून अमेरिकेचा ‘ब्लूबर्ड ब्लॉक-2’ (BlueBird Block-2) हा अत्याधुनिक आणि प्रचंड आकाराचा कमर्शियल सॅटेलाइट अवकाशात पाठवण्यात आला आहे. या सॅटेलाइटचं वैशिष्ट्य म्हणजे, तो थेट स्मार्टफोनवर हाय-स्पीड इंटरनेट सेवा देणार आहे. म्हणजेच भविष्यात मोबाईल टॉवर किंवा केबल्सशिवाय, थेट अंतरिक्षातून इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळू शकणार आहे.
LVM3 रॉकेटला ‘बाहुबली’ हे नाव त्याच्या अपार क्षमतेमुळे देण्यात आलं आहे. हेच रॉकेट चंद्रयान-2 आणि चंद्रयान-3 सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमा यशस्वीपणे पार पाडले आहे. तीन टप्प्यांमध्ये काम करणाऱ्या या रॉकेटची गणना आज जगातील सर्वात भरोसेमंद हेवी-लिफ्ट लॉन्च व्हेईकल्समध्ये केली जाते.
या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताने पुन्हा एकदा जागतिक अंतरिक्ष क्षेत्रात आपली तांत्रिक क्षमता, अचूक नियोजन आणि सुरक्षिततेबाबतची जबाबदारी अधोरेखित केली आहे.
Metal Ganesha Tea Light Showpiece | Decorative Items for Gifts & Home Decor Only Rs 180/-

