MumbaiNewsUpdate : पहलगाम हल्ल्यानंतर मुंबई हाय अलर्टवर , सीएसएमटी स्थानकाची सुरक्षा वाढवली….

मुंबई : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.22 एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात 28 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई हाय अलर्टवर आली असून मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT) रेल्वे स्थानकावर आज रेल्वे पोलिसांकडून रूट मार्च करण्यात आला.
सीएसएमटी हे मुंबईतील एक प्रमुख आणि अत्यंत वर्दळीच रेल्वे स्थानक आहे. या स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी ये- जा करतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.
मुंबई रेल्वे पोलीस दल (RPF) आणि गृह रक्षक पोलिसांसोबत एमएसएफ पोलिसांकडून डॉग स्क्वॉड, संपूर्ण टीम सोबत रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल केले जात आहे . भारताने पाकिस्तानवर निर्बंध घालायला सुरुवात केल्यानंतर या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून सातत्याने भारताला धमक्या दिल्या जात आहेत .पाकिस्तानी मंत्र्यांकडून प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत . या पार्श्वभूमीवर मुंबईत पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत . मुंबईत याआधी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांकडे पाहता, महाराष्ट्राच्या राजधानीत अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांसह गृह रक्षक पोलिसांनी रूट मार्च काढला आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली असून खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईत अलर्ट जारी करण्यात आलाय .आता मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि आरपीएफ यांच्याकडून संयुक्त पाहणे केले जाणार आहे . आरपीएफ एमएसएफ जीआरपी तसेच डॉग स्क्वॉड कडून सीएसएमटी स्थानकावर गस्त घातली जात आहे .सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच रेल्वे स्थानक परिसरात कोणती संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळते का? गर्दीच्या ठिकाणी बागांची तपासणी तसेच परिसरातील कानाकोपऱ्याची तपासणी पोलिसांकडून केली जात आहे . सध्या संपूर्ण रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे .