Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा सक्रीय , लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट ….

Spread the love

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. येत्या 23 तारखेला जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती,उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत आणि खासदार संदिपान भुमरे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अचानक भेट घेतली, त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली.

उदय सामंत यांनी पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे जरांगे यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केली आहे. मागील दोनवर्षांपासून जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगे यांना आश्वासन दिले  होते , आता आश्वासनाची मुदत संपत आहे. त्याआधी सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली आणि येत्या 23 तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन जरांगे यांच्या मागण्यासंर्दभात चर्चा करणार असल्याचं सामंत यांनी म्हंटलंय.

दरम्यान कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करावे असं जरांगे यांनी म्हटले आहे . सरकारला दिलेली मुदत 30 एप्रिलला संपत आहे. त्यामुळे सरकारने मागण्या मंजूर केल्या राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करूअसा इशाराही जरांगे यांनीसरकरला दिला आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटले  होते . त्यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली असून राजकारणाच्या पलीकडे जाऊन आम्ही जाहीरपणे भेटलो आहे. संजय राऊतांनी शिंदेंच्या कामाचं प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. त्यांच्याकडे असलेले दहा पंधरा आमदार त्यांनी व्यवस्थित सांभाळावे. त्यांच्यावर टीका करून आम्हाला संजय राऊत यांना मोठं करायचं नाही असे  सामंत यांनी म्हटले  आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!