मोठी बातमी : सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार….न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल सादर !!

मुंबई : परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील समोरील संविधानाच्या प्रास्ताविकाची विटंबना झाल्यानंतर उसळलेल्या दंगलीत न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी या विद्यार्थ्याचा पोलिसांच्या मारहाणीतच मृत्यू झाला असून त्याच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचे दंडाधिका-यांचा चौकशीचा अहवालात म्हटले आहे. यावरून राज्यभरात मोठे आंदोलन झाले होते. सरकार यावर आता काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे आहे.
असल्याचे वृत्त एबीपी माझाने या बाबत दिलेल्या वृत्तानुसार , या प्रकरणात न्यायदंडाधिकाऱ्यांनी 451 पानी गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर केला आहे. दरम्यान आयोगानेही या अहवालाची गंभीर दखल घेत संबंधित सर्व पोलीसांना नोटिसा बजावून त्यांच्याकडून उत्तर मागितले आहे. सोमनाथ यांचा 15 डिसेंबर रोजी कोठडीत असताना मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण राज्यात तापले होते. त्यावरून राज्य सरकारने न्यायालयीन चौकशी आदेश दिले होते . या चौकशीत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीतच सोमनाथचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या अमानुष मारहाणीमुळे सूर्यवंशींच्या शरीरावर अनेक जखमाही होत्या, असे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. मात्र राज्य सरकारणने अद्याप एकाही पोलीस अधिका-यावर कारवाई केलेली नाही. परिणामी आम्हाला सरकारची मदत नको, पण दोषींवर कारवाई हवी आहे, अशी ठाम भूमिका सोमनाथ यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांनी घेतली आहे. तर दोषी पोलीसांवर कठोर कारवाईची मागणी कुटुंबिय सातत्याने करत आहेत.
हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव उघड झाला….
परभणी हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूने राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांच्या अमानुष मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, असा आरोप सातत्याने करण्यात आला होता. मात्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा दावा प्रशासनाने केला होता. यानंतर शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून, पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्याचे उघड झाल्यानंतर परभणीत एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले . जवळपास दोन महिन्यांनी ही कारवाई करण्यात आली होती. अशातच आता न्याय दंडाधिका-यांचा चौकशीचा अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्याने यात पोलिसांवर आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार….
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीत झाला आहे. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात पोलिसांवर हा ठपका ठेवण्यात आला आहे. परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीना मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला. आयोगाने संबंधित सर्व पोलिसांना नोटीसा बजावून उत्तर मागितलं आहे. “परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला पोलीस जबाबदार आहेत. त्यांना परभणी जिल्ह्यातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात मारहाण करण्यात आली” असा निष्कर्ष न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या चौकशीतून काढला आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. हा 451 पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे.