धनंजय मुंडे यांचा राजीनामा, सुरेश धस यांना दोन दोन बायका, औरंगजेबच्या औलादी राज्य करतायत का? , ठाकरेंची शिवसेना आक्रमक

सोलापूर : सध्या राज्यात विविध प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यामुळं अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा काल राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज पुन्हा ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आले आहेत. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे. त्यानंतर जयकुमार गोरे यांच्याविरोधात सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापुरात ठाकरे गटाची निदर्शने सुरु आहेत. जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या आरोपनंतर सोलापुरात ठाकरे गटाने गोरे यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे. सोलापूर ही सिद्धेश्वरांची पावन भूमी आहे. या भूमीत असला नालायक पालकमंत्री नको अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा, आज जयकुमार गोरे यांचे हे प्रकरण, सुरेश धस यांना दोन दोन बायका, औरंगजेबची औलादी राज्य करतायत का? अशी टीका शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, ठाकरे गटाची मागणी
संतोष देशमुखांची हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटानं आज पुण्यात केली आहे. शिवाय महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्या जयकुमार गोरे यांची देखील मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा, या मागण्यासाठी पुणे शहर ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पुण्यातील गुडलक चौकात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाकरे गटाचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. तसेच अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी शिवसैनिकांनी केली. तसंच तानाजी सावंत, जयकुमार गोरे, वाल्मीक कराड, धनंजय मुंडे यांच्या फोटोला शिवसैनिकांनी शेण फासले.
८ वर्षांपासून दिल्ली हायकोर्टात खटला चालू आहे. लाखो रुपये खर्च केले जात आहेत पण दिल्ली विद्यापीठ माहिती द्यायला तयार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी अडाणी असले तरी चालतील काहीही हरकत नाही पण डिग्री दाखवत नाहीत कळायला तयार नाही. परीक्षा पे चर्चा करतात. मोदी विद्यार्थ्यांसमोर भाषण देतात. विद्यापीठांच्या पदवीदान समारंभाला जातात पण मोदी ना स्वतःच्या शिक्षणाबद्दल बोलतात , ना क्लासमेट बद्दल बोलतात ना शिक्षकांबद्दल … हे काय गौडबंगाल आहे कळत नाही. २०१६ मध्ये केजरीवाल यांनी माहिती अधिकारात माहिती विचारली पण गुजरात विद्यापीठ माहिती देत नाही. जी डिग्री अमित शाह यांनी दाखवली पण त्यातही घोटाळा झाला. तारखांमध्ये मोठा फरक दिसला. नावामध्येही फरक दिसला. यावरून रवीशकुमार यांनी स्वतंत्र व्हिडीओ बनवला आहे नक्की पहा.