BeedCrimeNewsUpdate : बीड जिल्ह्यात पुन्हा एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर, जालन्यामध्येही तरुणाला दिले लोखंडी सळईने चटके

बीड : बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचे प्रकार थांबता , थांबायला तयार नाहीत . अशाच आणखी एका मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मारहाणीचा असल्याचे सांगितले जात आहे. यात कुख्यात गुंड सतीश भोसले यांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा पाहायला मिळत आहे. सतीश भोसलेने बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील एका गरीब व्यक्तीला मारहाण केल्याचे समोर आले आहे.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर बीड जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचे सत्र संपता संपत नसल्याचे चित्र समोर येत आहे. बीडमध्ये चोरी, घरफोडी, मारामारी, बलात्कार, छेडछाड, लुटमारीसारख्या घटना सुरूच आहेत. यामुळे जिल्ह्यातील सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी पाहता बीडला बिहार असे संबोधले जात आहेत. त्यातच आता बीड जिल्ह्यात पुन्हा एका व्यक्तीला बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
या व्यक्तीला मारहाण करणाऱ्याचे नाव सतीश भोसले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मारहाण करणाऱ्या व्यक्तीचे पोलिसांसोबतच संबंध असल्याची सुद्धा माहिती समोर आली असून ही व्यक्ती एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यातील अमानुष मारहाणीचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
बॅटने मारहाण, संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले !!
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत एक पांढरा शर्ट परिधान केलेला व्यक्ती दिसत आहे. या व्यक्तीला एक जण बॅटने मारहाण करताना दिसत आहे. त्याच्या आजूबाजूला काही व्यक्ती उभ्या असल्याचे दिसत आहेत. त्यादेखील त्याला मारहाण करताना दिसत आहे. त्या व्यक्तीला अत्यंत क्रूरपणे मारहाण केली जात आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्तीचे सगळेच दात तुटले असल्याची माहिती समोर येत आहे. मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
जालन्यातही मानवी मानवी कौर्याचां आणखी एक व्हिडीओ , अमानुषपणे दिले चटके
जालना जिल्ह्यातील तालुक्यातील अनवा येथील एका व्यक्तीला चटके देऊन मानवी कौर्याचां आणखी एक व्हिडीओ समोर आला. तप्त लोखंडी सळईने अंगावर चटके देऊन अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला अन् राज्यात पुन्हा उद्रेक झाला. या घटनेनंतर अधिवेशन सुरू असताना सभागृहात छगन भुजबळांनी असे कृत्य करणाऱ्या हैवानावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.
छगन भुजबळ सभागृहात आक्रमक….
भुजबळ म्हणाले की , धनगर समाजाच्या तरूणांला अक्षरशः निर्घृणपणे तप्त लोखंडी सळईचे चटके देण्यात आले. धनगराचा माणूस आहे आपण बोलायचं नाही… कोण करणार याचा निषेध? महाराष्ट्र चाललाय कुठे? असे एक न् अनेक फोटो दाखवत छगन भुजबळ सभागृहात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ‘औरंगजेबीपणा महाराष्ट्रात परत कसा काय आला? हा माणूस एकच नाहीतर अनेक लोकं असतील. त्याला पकडणारे, त्याला चटके देणारे किती लोकं असतील ते सगळे बघत बसले? असा आक्रमक सवाल करत ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’, असं छगन भुजबळ म्हणाले. पुढे त्यांनी असेही सांगितले, घडलेल्या प्रकारानंतर केवळ सरकार, पोलीस यंत्रणा आणि जिल्ह्याचे एसपी यांना दोष देऊन चालणार नाही. महाराष्ट्रातील आपली संस्कृती अशी नाही. ही संताची भूमी आहे. राज्याचा विकास व्हायला हवा. पण ज्या माणसासाठी विकास करायचा तो माणूस जनावरासारखं मारला जात असेल तर विकास कोणासाठी झाला पाहिजे? असा सवालही भुजबळांनी सभागृहात उपस्थित केला.
एकनाथ शिंदे यांनी घेतली व्यक्तिशः दखल
दरम्यान या प्रकरणात आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी आणि सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर शिवसेनेचे छ्त्रपती संभाजी नगरचे जिल्हाप्रमुख जंजाळ यांना पाठवून जखमी व्यक्तीवर होणाऱ्या उपचाराचा सर्व खर्च उचलण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार जंजाळ यांनी पीडिताची भेट घेऊन शिंदे यांचे बोलणे करून दिले तेंव्हा आपण पाठीशी असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनीही , या प्रकरणी आपण जिल्हा पोलीस प्रमुखांशी बोललो असल्याचे सांगितले. पीडिताच्या भावाने आणि आईने आपली भेट घेतल्याचे सांगून त्या म्हणाल्या की , सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या अमानुष मारहाणीबद्दल आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे.