Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : केंद्रीय मंत्र्यांनी स्वतःच्या मुलीच्या छेडछाडीची तक्रार देऊनही दोन दिवस पोलीस दखल घेत नाहीत तेंव्हा ….

Spread the love

जळगाव : महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनांवरुन महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरण ताजं असतानात जळगावमध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार घडलाय. खुद्द केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील यात्रा महोत्सवातला हा धक्कादायक प्रकार घडला. काही टवाळखोर तरुणांनी रक्षा खडसेंच्या मुलीसह अन्य मुलींची छेड काढली. यावर रक्षा खडसे चांगल्याच संपातल्य आणि त्यांनी थेट मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला जात घटनेच्या तपासावरून पोलिसांची खरडपट्टी काढली.

विशेष म्हणजे पोलिसात तक्रार देऊन दोन दिवस उलटूनही पोलीस केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांच्या तक्रारीवर कारवाई करीत नाहीत ही अत्यंत धक्कादायक बाब आहे . खडसे यांच्या मुलीची छेड केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. तर, खडसे कुटुंबीयांनी देखील हे प्रकरण गंभीरतेनं घेत थेट आरोपींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुली मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील संत मुक्ताई यात्रेमध्ये गेल्या होत्या. त्यावेळी, येथील काही टवाळखोरांनी या मुलींची छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने जळगावात खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर दोन दिवस उलटूनही कारवाई हॉट नाही ही पाहून टवाळखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले त्यानंतर या प्रकरणात 5 जणांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या संबंधीच्या बातम्या सुरू झालयानंतर सरकारची अब्रू झाकण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुढे येऊन कारवाईची माहिती सांगावी लागली.

नेमकं प्रकरण काय?

मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात महाशिवरात्री निमित्त आदिशक्ती मुक्ताबाईची यात्रा भरते. या यात्रेनिमित्त कोथळी विविध कार्यक्रम पार पडतात. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची कन्या या यात्रेत फराळ वाटप करत होती. यावेळी भोई नावाचा तरुण तिचा पाठलाग करत होता. त्यानंतर रक्षा खडसे यांची कन्या यात्रेमध्ये सायंकाळच्या वेळेस मैत्रिणीबरोबर फिरायला गेली असता भोई नावाच्या तरुणासह काही टवाळखोरांनी तिचा पाठलाग केला. ती ज्या पाळण्यामध्ये बसत होती, त्या पाळण्यामध्ये सुद्धा तरुण बसला. त्यानंतर काही व्हिडिओ चित्रित केले. ही बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्याला मज्जाव केला. परंतु टवाळखोरांनी सुरक्षारक्षकाशी झटापट केली. यानंतर टवाळखोर तरुणांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी रक्षा खडसे चांगल्याच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. टवाळखोर व छेडखानी करूनही तरुण मोकाट असल्याने रक्षा खडसे यांनी पोलिसांना जाब विचारला. यानंतर मुक्ताईनगर पोलिसांनी अनिकेत भोई,पीयूष मोरे, सोम माळी,अनुज पाटील किरण माळी या पाच जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत भोई याला पोलसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

छेड काढणारे कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेचे….

दरम्यान, मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची ज्या मुलांनी छेड काढली ती मुले शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी याबाबत मोठा दावा केला आहे. एफआयआरमधे नाव असलेले अनिकेत भोई, पियूष मोरे यांचे आमदार चंद्रकांत पाटील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!