MaharashtraPoliticalUpdate : पत्रकारांनी विचारले तेंव्हा कोल्ड वॉरच्या विषयावर एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले….

मुंबई : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवशेनाला उद्या सुरुवात होणार आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी महायुतीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य करीत महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचेही म्हटले.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून महायुतीत बिनसल्याची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या फाईलला मुख्यमंत्र्यांकडून स्थिगिती दिली जात असल्याची चर्चा आहे. यावरून महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप केले जात आहेत. महायुतीतील कोल्डवॉरच्या चर्चेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. तर एकनाथ शिंदे म्हणाले, ‘महायुती सरकारचं दुसरं अधिवेशन आहे. पहिल्या अर्थसंकल्पाला सुरुवात होणार आहे. आमची टीम जुनीच आहे, फक्त फडणवीस आणि माझ्या खुर्च्यांची अदलाबदल झाली आहे. अजितदादांची खुर्ची मात्र फिक्स आहे. अडीच वर्षात महायुतीने चांगलं काम केलं म्हणून आम्हाला विजय मिळाला. मोठा विजय झाल्याने आमची जबाबदारी वाढली आहे. राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे.
महायुतीमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा होत असतात. यावरही एकनाथ शिंदे यांनी वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘मला एवढं सांगायचंय, मुद्दाम चर्चा होतात. ज्यांच्यावर विश्वास नाहीये ते काहीही बातम्या देतात. त्याच बातम्या छापल्या जातात. काहीही झालं तरी आमच्यामध्ये काही ब्रेक होणार नाही. कोल्ड वॉर.. कोल्ड वॉर.. कुठलं काय कुठं आहे का कोल्ड वॉर? उन्हाळ्यात कुठं कोल्ड वॉर. इथं सगळं थंडा थंडा कूल कूल आहे.’
स्थगितीच्या बातम्या बाळबोध आहेत ….
पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘नवीन सरकार बनते, तेव्हा विरोधकांना सकारत्मक चर्चेची संधी असते. विरोधकांना संवादाची गरज होती. आम्ही त्यांना चहापानासाठी निमंत्रित केलं होतं. त्या संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संवाद साधा, असं म्हणायचं. त्यांनी पत्र दिलं. त्यांचं वर्तमानपत्रावरील बातम्यांवर आधारित आहे. त्या बातम्यांसोबत सरकारने दिलेला खुलासा वाचला पाहिजे होता. त्यांनी अधिवेशनात मुद्दे मांडले तर त्याचं उत्तर द्यायचा तयार आहोत’.
‘दोन महत्वाच्या चर्चा सभागृहात ठेवल्या आहेत. पुण्यश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनीमित्त चर्चा होईल. त्यादिवशी महिला दिन असल्याने महिला सक्षमीकरणावर चर्चा होईल,असे फडणवीस म्हणाले.
‘अलिकडे स्थगितीची बातमी पाहायला मिळते. ती स्थगिती मुख्यमंत्र्यांनं दिल्याची बातमी असते. त्यानंतर मला ऑफिसला विचारावं लागतं. त्यानंतर कळतं की, आपल्याकडे ही फाईल आलेली नाही. त्यामुळे ही फाईल शोधावी लागते. आम्हाला कोणत्याही आमदाराने निवदेन दिल्यानंतर मागणी किंवा आरोप केला असेल, त्याला दुर्लक्ष करत नाही. स्थगितीच्या बातम्या बाळबोध आहे. दुसरी बाजू आल्यावर कारवाई होते, असे त्यांनी सांगितले.
तिघांनीही काढले एकमेकांना चिमटे
राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले . दरम्यान विरोधकांनी चहापानावार बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत आठवडाभर होणाऱ्या कामकाजासंदर्भात माहिती दिली. दरम्यान, या पत्रकार परिषदेत तिन्ही नेत्यांनी गंमतीदार प्रतिक्रिया दिल्या, तसेच एकनाथ शिंदे व अजित पवारांनी एकमेकांना चिमटे काढले.
एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना तुफान फटकेबाजी पुन्हा पाहायला मिळाली आहे केल्याचं पाहायला मिळालं. सरकारची टर्म नवी असली तरी सुद्धा टीम जुनी आहे. फक्त आमच्या दोघांच्या खुर्च्यांची (एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) आदलाबदल झाली आहे. अजित दादा उपमुख्यमंत्री फिक्स आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर लगेच अजित पवारांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. तुम्हाला फिक्स ठेवता आली नाही त्याला मी काय करू, असे अजित पवार म्हणाले. हा संवाद होताच मोठा हशा पिकला. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आमची रोटेटिंग चेअर आहे, असे म्हणत सारवासारव केली.
आम्ही विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही…
अजितदादा पुन्हा अर्थसंकल्प मांडतील आम्ही विरोधकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. विरोधकांच्या आरोपांना आम्ही कामानं उत्तर देत राहणार आहे. आमच्यात कोणताही वाद नाही, कोणताही कोल्ड वॅार नाही आम्ही कुठेही अधिवेशन आटपून टाकाव अस आम्ही काम केलं नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
विरोधकांचे 9 पानांचे पत्र : अजित पवार
महायुतीचं सरकार चांगलं चालाव यासाठी सर्वांचा प्रयत्न आहे. सरकारचं चार आठवड्याचं अधिवेशन असणार आहे. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची आमची तयारी आहे. कामकाज रेटायचं असं काम आम्ही अजिबात करणार नाही. विरोधी पक्षानं आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठं 9 पानांचे पत्र दिले आहे, असे अजित पवार म्हणाले.