Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

SharadPawar News Update : पक्षात्मक बांधणीसाठी शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय , या नेत्यांवर दिल्या विशेष जबाबदाऱ्या…. 

Spread the love

मुंबई : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली असून त्या माध्यमातून राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांवर विभागवार जबाबदारी देण्यात आली असून त्या नेत्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची मुंबईत बैठक पार पडली. त्यामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर चर्चा करण्यात आली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीला सर्व आमदारांची आणि खासदारांची उपस्थिती होती. पक्ष वाढीसाठी काही प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर पक्षाने जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे.

या नेत्यांनी प्रत्येक महिन्यात जिल्ह्यांचे दौरे करून आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती अखण्यात आली आहे. जिथे रिक्त पद असतील तिथे पद भरली जाणार आहेत. पदाधिकारी बदलायची जर गरज वाटत असेल तर पदाधिकारी देखील बदलले जातील.

पक्षाच्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना शरद पवारांनी दिल्या आहेत. पुढच्या तीन महिन्यात महाराष्ट्र पिंजून काढा आणि त्याचा अहवाल द्या असे आदेश पवारांनी नेत्यांना दिले आहेत.

कोणाकडे कोणती जबाबदारी?

मराठवाडा : राजेश टोपे आणि जयप्रकाश दांडेगांवकर.

विदर्भ :  राजेंद्र शिंगणे आणि अनिल देशमुख.

कोकण : जितेंद्र आव्हाड आणि सुनिल भुसारा.

प. महाराष्ट्र : हर्षवर्धन पाटील .

उत्तर महाराष्ट्र :  हर्षवर्धन पाटील.

या बैठकीबाबत पक्षाचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले की, “शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय झाले. त्यामध्ये सरकारच्या पहिल्या 100 दिवसांच्या कार्यक्रमावर लक्ष ठेवणारी टास्क टीम तयार करण्यात आली. तसंच विभागनिहाय जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं असून 7-8 मार्चपासून या नेत्यांना विभागनिहाय दौरे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाबाबत निर्णय हा महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल. या अधिवेशनात विरोधी पक्ष नेतेपदाबाबत जो प्रस्ताव दिला जाईल त्यावर सरकारनंही विचार करावा असा ठराव या बैठकीत मांडण्यात आला आहे.”

युवक अध्यक्षपदी फहाद अहमद

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी फहाद अहमद यांची निवड करण्यात आली आहे. फहाद अहमद यांनी नुकतीच पक्षाकडून अणुशक्तीनगर विधानसभेची निवडणूक लढली होती. फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्कर यांचे पती आहेत. त्यांची युवक राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!